शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या राजकारणात गोंडपिंपरी तालुक्याची कुचंबणा

By admin | Updated: September 16, 2015 01:01 IST

जिल्हा सीमेवर असलेल्या गोंडपिंपरी तालुका हा नक्षलग्रस्त, अतिदुर्गम व आदिवासी बहुल तालुका म्हणून परिचित आहे.

गोंडपिंपरी : जिल्हा सीमेवर असलेल्या गोंडपिंपरी तालुका हा नक्षलग्रस्त, अतिदुर्गम व आदिवासी बहुल तालुका म्हणून परिचित आहे. ९८ गावांचा विस्तारीत तालुका असलेल्या गोंडपिंंपरी तालुक्यातील अनेक ग्रामखेडे विकासापासून कोसोदूर असून रस्ते, वीज, पाणी, निवारा, आरोग्य सेवा व शेती उपयोगी सिंंचनाच्या व्यवस्थेअभावी तालुक्याच्या नशिबी अठराविश्व दारिद्र्य अजूनही कायम आहे. विकासाच्या राजकीय दृष्टिकोनातून या तालुक्याला आजही सावत्राप्रमाणे वागणूक मिळत असल्याने ‘विकास’ या शब्दाचा नेमका अर्थ काय, हे देखील येथील नागरिकांना आजवर कळलेले नाही.गेल्या पाच वर्षाचा राजकीय आढावा घेतल्यास काँग्रेसच्या सत्ताकाळात राजुरा क्षेत्राचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी क्षेत्रासाठी ५०० कोटीहून अधिक विकास निधी खेचून आणला. याचा निश्चितच फायदा तालुक्याला झाला होता. गाव तिथे सिमेंट रस्ते, वीज पुरवठा, पाणी अशा अनेक ठिकाणच्या समस्यांना पायाबंद घालण्यात माजी आमदार सुभाष धोटे यांना यश मिळाले. मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात मोदी लाटेसह भाजपाचे अच्छे दिनाचे बोल यामुळे जनतेत सत्ता परिवर्तनाची लाट आली आणि केंद्र व राज्यात भाजपाने सत्ता काबीज केली. याच दरम्यान प्रचार कार्यात लगतच्या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी अ‍ॅड. संजय धोटे यांच्या प्रचारसभेत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रासह राजुरा विधानसभा क्षेत्राचा विकास करण्यासाठी ‘डब्बल इंजिन’ जोडण्याचा आत्मविश्वासात्मक आव्हान जनतेपुढे मांडले. यावर राजुरा क्षेत्राती जनतेनेही भरभराटीने मतदान करुन भाजपाचे कमळ दोन्ही क्षेत्रात फुलविले. राज्यात सत्ता स्थापना होताच आमदार सुधीर मुनगंटीवार यांना राज्याचे अर्थ, वन व जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले. मात्र आज वर्ष लोटूनही राजुरा क्षेत्रात काही शुल्लक विकासकामे वगळता येथील जनतेचा भ्रमनिरासच झाल्याचे चित्र दिसून येत आहे. गोंडपिंपरी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय आहे. सदर उपविभागत गोंडपिंपरी आणि पोंभूर्णा अशा दोन तालुक्यांचा पूर्वी समावेश असताना गेल्या आॅगस्ट महिन्यापासून पोंभूर्णा तालुक्याला मूल उपविभागात जोडण्यात आले. आज मूल उपविभागांतर्गत कोट्यावधींंची विकास कामे सुरू आहे. तर गोंडपिंपरी उपविभागात साधी डागडूजी व किरकोळ कामे करण्याकरिताही निधी उपलब्ध नाही. तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून आसमानी संकटामुळे सतत नापिकी होवून येथील शेतकरी राजा कर्जात बुडाल्याचे दिसून येते. सिंचन प्रकल्पही रेंगाळलेले आहेत. तालुक्यात बेरोजगाराची समस्या, एसटी आगार, आरोग्य सेवा, शैक्षणिक समस्या व ग्राम खेड्यांचा विकास आदी गंभीर प्रश्नांमुळे तालुक्याचा विकास खुंटला असून तालुक्याची विकास गती मंदावली आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन विकास कामांना गती देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)