शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरोगमुक्तीसाठी सर्वजण झटू या !

By admin | Updated: March 27, 2017 00:40 IST

जागतिक क्षयरोग दिनाचे निमित्याने क्षयरोग जनजागृती रॅली शुक्रवारला काढण्यात आली. सदर रॅलीचे उद्घाटन ....

प्रतिज्ञा : क्षयरोग जनजागृती रॅलीचंद्रपूर : जागतिक क्षयरोग दिनाचे निमित्याने क्षयरोग जनजागृती रॅली शुक्रवारला काढण्यात आली. सदर रॅलीचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मुरंबीकर यांच्या हस्ते राबर्ट कॉक यांच्या प्रतिमेला दिप प्रज्वलन व मालाअर्पण करण्यात आले. यावेळी क्षयरोग संपवण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.सदर रॅलीला डॉ. मुरंबीकर, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीराम गोगुलवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस.वाय. पुल्लकवार, महाराष्ट्र मेडीकल कौन्सीलचे सदस्य डॉ. मंगेश गुलवाडे, आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ. प्रमोद बांगडे, आय.एम.ए.चे सचिव डॉ. पियुष मुत्यलवार, रोटरी क्लब प्रकल्प सचिव अंजुम कुरेशी, नेहरू युवा केंद्राचे नजीर कुरेशी यांनी हिरवी झेंडी दाखवल्यानंतर रॅलीला सुरुवात झाली. सदर रॅली जिल्हा क्षयरोग केंद्र चंद्रपूर येथून रामनगर मार्ग, जटपुरा गेट, पाण्याची टाकी व जिल्हा क्षयरोग केंद्र येथे समाप्त झाली. सदर रॅलीला जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी, पंकज शिक्षण संस्था, जनहिताय मंडळ, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथील नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, प्रभादेवी नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर एम.डी.आर. व एक्स.डी.आर. रुग्णासाठी प्रोटीन पावडर वाटप कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी रुग्णांना रोटरी क्लबचे अध्यक्ष अशोक हसानी, सचिव स्मिता जिवतोडे यांच्या हस्ते रुग्णांना प्रोटीन पावडर वाटप करण्यात आले.सदर रॅलीच्या यशस्वीतेसाठी डॉ. पुल्लकवार, प्रकाश रामटेके, खिरेंद्र पाझारे, किशोर माणुसमारे व जिल्हा क्षयरोग केंद्रातील सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले.(नगर प्रतिनिधी)