शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

राजुऱ्यात आदिवासींचे धरणे आंदोलन

By admin | Updated: August 17, 2014 23:06 IST

आदिवासींच्या आरक्षणाची मागणी करून आदिवासी प्रवर्गात शिरू पाहणाऱ्या धनगर या जातीसह इतर जातींच्या घुसखोरीला विरोध करणे व आता आदिवासींना भेडसावणाऱ्या इतर मागण्यांच्या पुर्ततेसाठी

राजुरा : आदिवासींच्या आरक्षणाची मागणी करून आदिवासी प्रवर्गात शिरू पाहणाऱ्या धनगर या जातीसह इतर जातींच्या घुसखोरीला विरोध करणे व आता आदिवासींना भेडसावणाऱ्या इतर मागण्यांच्या पुर्ततेसाठी आदिवासी समाज बांधवांनी आदिवासी आरक्षण बचाव समितीचे सभासद बापुराव मडावी यांच्या नेतृत्वात राजुरा येथील उपविभागीय कार्यालयासमोर एकदिवस धरणे दिले. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले. आदिवासी शांत संयमी असला तरी त्यांचा अंत पाहु नका, तुम्ही पोटभर जेवण करा, मात्र आमच्या तोंडातील घास हिसकावण्याचा प्रयत्न केल्यास ते हात तोडून टाकण्यास आम्ही मागे पाहणार नाही. आजपर्यंत आदिवासींच्या जमिनी हडपल्या, त्यांच्या नोकऱ्या चोरल्या. परंतु स्वत:ला सुशिक्षीत व सुज्ञ समजणारे हे लोक आदिवासींची जातही चोरायला निघाले आहेत. अशा चोरांनी व त्यांना सहकार्य करणाऱ्या स्वार्थी राजकारणी नेत्यांना येत्या निवडणुकीत अद्दल घडवा, असे आवाहनही समाज बांधवांना यावेळी करण्यात आले. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी समाज बांधवांना मार्गदर्शन करताना धनगर जातीला आदिवासीमध्ये समावेश करण्यास विरोध दर्शविला.धनगर जातीसह अन्य जातीला आदिवासीमध्ये समाविष्ट करू नये, अनुसुचित क्षेत्रासाठी लागू झालेल्या पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, ९ जूनला राज्यपालांनी काढलेल्या अधिसुचनेची वेळीच अंमलबजावणी करा, चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासींसाठी असलेल्या १५ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, वनजमिनीचे पट्टे तातडीने देण्यात यावे, स्थानिक पुराव्याच्या आधारे जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. हे निवेदन प्रभारी उपविभागीय अधिकारी खलाटे यांनी स्विकारले.धनगर आदिवासी हो नही सकता... हमारा हक ले नही सकता, आदिवासी जागो हो.. संघर्षाचा धागा हो, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत आदिवासी समाज बांधवांनी भवानी मंदिरापासून भव्य रॅली काढली. आरक्षण बचाव कृती समितीचे संयोजक बापुराव मडावी, जि.प. सदस्य भिमराव पा. पुसाम, नगराध्यक्ष मंगला आत्राम, सुधाकर उईके, जितेश कुळमेथे, वाघुजी गेडाम, पं.स. सदस्य निर्मला कुळमेथे, श्यामराव कोटनाके, भाऊ कन्नाके, लिंगु पा. कुमरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या रॅलीत राधाबाई आत्राम, कुंदा सलाम, प्रभाकर उईके, जंगु वेडमे, शंकर तोडासे यांच्यासह शेकडो समाजबांधव मोर्चात सहभागी झाले होते. आभार धिरज मेश्राम यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)