शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

वटवृक्ष म्हणजे शाश्वत मिळणारा प्राणवायू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:24 IST

वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. भारतीय समाजजीवनात वटवृक्षाला कुटुंबप्रमुखासारखे मानाचे स्थान आहे, आज सिमेंटची जंगले सातत्याने वाढत असताना जगण्यापुरता आॅक्सिजन आपणास मिळणे आवश्यक असल्याने एक तरी झाड प्रत्येकाने लावावे हा संकल्प सर्वांनी घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महापौर अंजली घोटेकर यांनी केले.

ठळक मुद्देअंजली घोटेकर : महानगरपालिकेचा १००० वटवृक्ष लागवडीचा सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. भारतीय समाजजीवनात वटवृक्षाला कुटुंबप्रमुखासारखे मानाचे स्थान आहे, आज सिमेंटची जंगले सातत्याने वाढत असताना जगण्यापुरता आॅक्सिजन आपणास मिळणे आवश्यक असल्याने एक तरी झाड प्रत्येकाने लावावे हा संकल्प सर्वांनी घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महापौर अंजली घोटेकर यांनी केले.राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड अंतर्गत शिक्षण प्रसारक मंडळ, मूल व चंद्रपूर शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने एक हजार वटवृक्ष लागवडीचा सोहळा १९ आॅगस्ट रोजी कर्मवीर कन्नमवार प्राथमिक शाळा येथे सकाळी १० वाजता पार पडला. याप्रसंगी त्या बोलत होत्या.वटवृक्षांची लागवड करण्याची चांगली कल्पना अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडली असता त्यांनी ती तात्काळ मान्य केली. वृक्षसंवर्धनासोबतच कागद व कापड वाचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. अनेकांना वृक्षलागवड करणे शक्य नसते, अशा व्यक्तींनी किमान परिसरातील आहेत त्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.यावेळी अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे म्हणाले, यावर्षी जिल्ह्यामध्ये ११ हजार वटवृक्ष लावण्याची संकल्पना आहे. याला जिल्हाधिकारी, वनविभाग, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांची साथ लाभते आहे, असेही ते म्हणाले.९० टक्के उद्दिष्ट पूर्णजिल्हाधिकारी कुणाल खेमणार म्हणाले, ३३ कोटी वृक्ष लागवडीत आपल्या जिल्ह्याचा मोठा वाट आहे. एक कोटी ६७ लक्ष वृक्ष आपण लावतोय. ते वृक्ष लावण्याचे काम आता ९० टक्यांवर पोहचले आहे. वृक्षलागवडीसाठी तीन महिन्यांचा कालावधी असला तरी दीड महिन्यातच आपण ९० टक्के उद्दिष्ट गाठले आहे. या व्यतिरिक्त वटवृक्ष लावण्याचे काम आपण हाती घेतले आहे. वटवृक्षाचे माहात्म्य वेगळे आहे, त्याचे आयुष्य व इतरांना आयुष्य देण्याची क्षमता अमर्याद आहे, असे यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीnagaradhyakshaनगराध्यक्ष