शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॉमा केअर सेंटर आॅक्सिजनवर

By admin | Updated: May 11, 2017 00:37 IST

वरोरा शहराला औद्योगिक नगरी म्हणून नवीन ओळख निर्माण होत आहे. शहरात नेहमीच नागरिकांची व प्रवाशांची वर्दळ असते.

पदे अद्यापही रिक्तच : शासनाच्या उदासीनतेचे आणखी एक उदाहरणलोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : वरोरा शहराला औद्योगिक नगरी म्हणून नवीन ओळख निर्माण होत आहे. शहरात नेहमीच नागरिकांची व प्रवाशांची वर्दळ असते. त्यात चंद्रपूर-नागपूर हायवेही शहराला लागून गेला आहे. यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. दुसरीकडे किरकोळ रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात आला तरी ‘रेफर टू चंद्रपूर’ अशीच परिस्थिती आजही कायम आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून व मोठा गाजाबाजा करून बांधण्यात आलेले ‘ट्रॉमा केअर सेंटर’ शासनाच्या उदासीन धोरणामुळे अजूनही रुग्णांना वाकुल्या दाखवित आहे.वरोरा शहर सर्व दृष्टीने परिसरातील गावांसाठी सोयीचे शहर आहे. नागपूर, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर व यवतमाळ या प्रमुख शहरांना जाण्यासाठीही वरोरा मार्ग सोयीचा आहे. त्यामुळे दररोज हजारो वाहने या मार्गाने जात असतात. परिसरात वाढलेली अपघाताची समस्या बघता शहरात ‘ट्रामा केअर सेंटर’ व्हावे म्हणून २०१० मध्ये प्रस्ताव सादर करण्यात आला होता. २०११ मध्ये कामाला सुरुवातही झाली आणि एक कोटी ४४ लाख ४२० रुपये खर्च करून भव्यदिव्य इमारत उभारण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उपजिल्हा रुग्णालयाला २०१६ मध्ये हस्तांतरितही करण्यात आले. पण अजूनपर्यंत शासनाला ट्रामा केअर युनिटच्या लोकार्पणाचा मुहूर्त सापडत नाही आहे, हे विशेष . ट्रामा केअरसाठी एकूण १५ जागा भरण्याची मान्यता मिळाली आहे. पण अजून एकही जागा भरलेले नाही. त्यामुळे देखरेख करणार कोण, असा प्रश्न निर्माण होत असून इमारतीची दैनावस्था झाल्यावर शासनाला जाग येईल का, असा प्रश्नही आता नागरिकांकडून विचारला जात आहे. इमारतीत भरतो मद्यपींचा मेळा शहरात ट्रॉमा केअर सेंटरची इमारत बांधण्यात आली आहे. पण अद्याप या सेंटरसाठी एकही पद भरलेले नाही. साधा सुरक्षा रक्षकही नाही. त्यामुळे तळीरामांना आणि प्रेमीयुगुलांना ट्रॉमा केअर सेंटरची इमारत म्हणजे आयती पर्वणीच ठरत आहे. अंधार पडला की तळीरामांचा मेळाच भरत असल्याचे दिसून येते. परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्या, पाण्याचे रिकामे पाऊच पडलेले दिसतात.साहित्य धूळखातगेल्या काही महिन्यांपूर्वी ट्राम केअर युनीटसाठी साहित्य पाठविण्यात आले होते. मात्र युनीटमध्ये पदभरतीच करण्यात आली नाही. त्यामुळे केअर युनीटसाठी आलेले साहित्य सध्या उपजिल्हा रुग्णालयात धूळ खात आहे.पदे मंजूर झाली आहेत. पण अद्याप भरण्यात आली नाहीत. याबाबत आपण वारंवार पाठपुरावा करीत आहोत. रुग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती होणे गरजेचे आहे. पदभरती झाल्यावर ट्राम केअर सेंटर सुरु होईल.-बाळू धानोरकर,आमदार वरोरा.