शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी गावातील तरुणांना देणार प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 05:00 IST

मानव- वन्यजीव संघर्ष उपाययोजना व इको टुरिझमबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली येत्या तीन दिवसांत बैठक घेण्यात येणार आहे. ब्रह्मपुरी-सिंदेवाही परिसरात जंगल सफारी, पर्यटनक्षेत्र व रोजगार संधी उपलब्ध करून देणे आणि संवेदनशील १२५ गावांना दरवर्षी २५ लाखांचा निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत वाघांची संख्या ताडोबापेक्षा जास्त असून, सुमारे १५० गावे अतिसंवेदनशील आहेत. वाघ व बिबट्याचा या गावांमध्ये नित्य संचार असतो. या क्षेत्रात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचल्याने वनविभागाने ठोस उपाययोजना करण्यासोबतच याबाबत तरुणांना प्रशिक्षण देण्याच्या सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी ब्रह्मपुरी येथील आढावा बैठकीत केल्या.यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, बी. एच. हुडा, उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे, तहसीलदार विजय पवार, जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर, स्मिता पारधी, वनसंरक्षक दलाचे प्रमुख बंडू धोत्रे, राजेश कांबळे  उपस्थित होते.  पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, संवदेनशील १५० गावांतील तरुणांची निवड करावी. वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी किंवा मृत होत आहेत. वाघ जनावरावर हल्ला करतो. आपल्या जनावराला वाचविण्याच्या प्रयत्नात गुराखी वाघाचा प्रतिकार करतो. या संघर्षातून गुराखी वाघाचा शिकार ठरत आहे. मात्र अशावेळी गुराख्यांनी जनावराला सोडून आपला जीव वाचवावा. वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या जनावरांचा मोबदला वनविभागाकडून मिळतो. पण, मानवी जीव जाणार नाही, याचीही खबरदारी घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांकडे बैठकमानव- वन्यजीव संघर्ष उपाययोजना व इको टुरिझमबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली येत्या तीन दिवसांत बैठक घेण्यात येणार आहे. ब्रह्मपुरी-सिंदेवाही परिसरात जंगल सफारी, पर्यटनक्षेत्र व रोजगार संधी उपलब्ध करून देणे आणि संवेदनशील १२५ गावांना दरवर्षी २५ लाखांचा निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

मुखर्जी योजना आता १५० गावांत - ब्रह्मपुरी वन क्षेत्रात ११४ वाघ, ११० बिबट्यांचा वावर आहे. वाघांचे स्थानांतरण करण्याबाबत धोरण निश्चित करावे. जनवन विकास योजनेतंर्गत शेतीला सोलर व चॅनलिंग कुंपण करावे, जंगलाला लागून असलेल्या शेतावर जाऊ नये म्हणून त्यासाठी दहा हजारांची मदत, श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेची व्याप्ती वाढवून अतिरिक्त १५० गावांत ही योजना राबविण्यात येईल. वाघाला पळविण्यासाठी विशेष काठी खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारforest departmentवनविभाग