शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

घरकुलाच्या धनादेशासाठी लाभार्थ्यांची भटकंती

By admin | Updated: April 5, 2015 01:30 IST

इंदिरा आवास योजनेअंतर्गत तालुक्यातील लाभार्थ्यांचे घरकूल बांधकाम पूर्ण होऊनसुद्धा बिले देण्यास टाळाटाळ केली जात असून बिले काढण्यासाठी पैशाची मागणी होत...

जिवती : इंदिरा आवास योजनेअंतर्गत तालुक्यातील लाभार्थ्यांचे घरकूल बांधकाम पूर्ण होऊनसुद्धा बिले देण्यास टाळाटाळ केली जात असून बिले काढण्यासाठी पैशाची मागणी होत असल्याचा आरोप घरकूल लाभार्थ्यांकडून केला जात आहे. शासनाने दारिद्रय रेषेखालील कुटुंबाना निवाऱ्याची सोय व्हावी, यासाठी इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजनेअंतर्गत असंख्य लाभार्थ्यांना घरकूल मंजुर करून दिले. त्याचे कामही पुर्ण झाले. घरकुलाचे काम पुर्ण झाले असेल तर संबंधित अभियंत्याकडून पाहणी करून घरकुलाची बिले टाकली जातात. मात्र काम झाल्यानंतरही बिले देण्यास संबंधित यंत्रणेकडून टाळाटाळ केली जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. लवकर बिले काढायची असेल तर पैसे द्यावे लागतात. तेव्हाच बिले मिळतील, असा सल्लाही काही अभियंत्याकडून मिळत असल्याचे बोलले जात आहे. संबंधीत कामाची बिले मिळावी, यासाठी लाभार्थी वारंवार पंचायत समितीचे उंबरठे झिजवित आहेत. त्यात त्यांचे आर्थिक नुकसान होत असून मानसिक त्रासही भोगावा लागत आहे. संबंधीत घरकूल लाभ्यार्थ्यांची चौकशी करून त्यांना कामाची बिले त्वरित दिली जावी, अशी मागणी घरकुल लाभार्थ्यांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)