शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक फोफावली

By admin | Updated: September 18, 2014 23:31 IST

चंद्रपूर जिल्ह्यात वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. लोकंख्याही वाढली आहे. मात्र वाहतुकीची साधने नसल्याने नागरिकांना खासगी वाहने घ्यावी लागत आहे. यामुळे शहरी व ग्रामीण भागात

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. लोकंख्याही वाढली आहे. मात्र वाहतुकीची साधने नसल्याने नागरिकांना खासगी वाहने घ्यावी लागत आहे. यामुळे शहरी व ग्रामीण भागात सध्या अवैध प्रवासी वाहतूक कमालीची वाढली आहे. याशिवाय उद्योगांमुळे जडवाहतूक वाढली आहे. या जडवाहतुकीमुळे रस्त्यांचे बारा वाजले असून जिल्ह्यात अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून नावारुपास आला आहे. सिमेंट उद्योग, कोळसा खाणी, थर्मल पॉवर स्टेशन, एमईएल, आर्डीनन्स फॅक्टरी याशिवाय अनेक उद्योग जिल्ह्यात आहे. आणखी अनेक उद्योग प्रस्तावित आहेत. या उद्योगांमुळे बाहेर राज्यातील कामगार, कर्मचारी जिल्ह्यात स्थायिक झाले आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या वाढून २३ लाखांच्या घरात गेली आहे. यासोबतच जिल्ह्यात मोठ्या शहरांच्या सीमारेषेतही वाढ होत आहे. शहरे वाढल्याने नागरिकांना प्रत्येक गोष्टींसाठी वाहनांची गरज पडू लागली आहे. नागपूर, मुंबईसारख्या मेट्रो सीटीप्रमाणे वाहतूक साधने नसल्याने स्वत:चे वाहन घेण्याशिवाय नागरिकांकडे पर्याय नाही. त्यामुळे वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. उद्योगांमुळे जिल्ह्यात औद्योगिक अपघातही वाढले आहेत. यामुळे रुग्णवाहिकांच्या संख्येतही वाढ होत आहे. यावर्षात १७ रुग्णवाहिका, ३३ मल्टी सर्व्हिसेस वेहीकल, २२६ ट्रक आणि लॉरी, १२ टँकर्स, ७८८ चारचाकी डिलेव्हरी वाहने, ९७ तीनचाकी डिलेव्हरी वाहने, ९६१ ट्रक्टर्स, २३२ ट्रेलर व इतर ६६ वाहनांचेही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पंजीकरण करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या संख्ये वाहने वाढत आहेत. मात्र त्या दृष्टीने वाहतूक व्यवस्थेत पाहिजे तसा बदल अजूनही घडून आलेला नाही. अरुंद रस्ते आणखी अरुंद होत आहेत. याशिवाय रस्त्यावरील अतिक्रमणे वाढली आहेत. ग्रामीण भागाला तालुका व जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्यांचीही संख्या अधिक आहे. मात्र या रस्त्यावरून परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या फारच कमी आहे. ज्या आहेत त्यांच्या दिवसातून दोनच फेऱ्या होतात. याशिवाय अनेक गावात जलद बसथांबा नाही. त्यामुळे अवैध प्रवासी वाहनांशिवाय पर्याय नाही. परिणामी अवैध प्रवासी वाहतूक प्रत्येक ठिकाणी फोफावल्याचे दिसून येते. घुग्घुस, राजुरा, बल्लारपूर, वरोरा या मार्गावर मोठ्या प्रमाणात जडवाहतूक सुरू असते. याबाबत वारंवार ओरड करूनही जडवाहुतकीवर निर्बंध लावण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे रस्त्यांचे बारा वाजत आहे. या सर्व प्रकारांमुळे जिल्ह्यात अपघाताची संख्या वाढली आहे. दररोज किरकोळ व मोठे अपघात घडतच आहेत. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे. (शहर प्रतिनिधी)