शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

घुग्घुस-वणी मार्गावर वाहतुकीचा खोळंबा

By admin | Updated: August 15, 2016 00:27 IST

येथून कोळसा घेऊन ताडाळीकडे जाणाऱ्या मालवाहू रेल्वे गाडीच्या इंजिनचे वीज वाहिनीचे तार व इंजिनला जोडणारा पिंटो तुटला.

दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा : वीज तार तुटल्याने रेल्वे मध्येच थांबली घुग्घुस : येथून कोळसा घेऊन ताडाळीकडे जाणाऱ्या मालवाहू रेल्वे गाडीच्या इंजिनचे वीज वाहिनीचे तार व इंजिनला जोडणारा पिंटो तुटला. यामुळे घुग्घुस - वणी मार्गावरील राजीव रतन दवाखान्याजवळच्या रेल्वे गेटवरील वाहतूक ठप्प झाली. तब्बल चार तास घुग्घुस -वणी महामार्गावरील वाहतूक बंद असल्याने रेल्वे गेटच्या दोन्ही बाजूनी दोन कि.मी. पर्यत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. हा प्रकार आज रविवारी सकाळी घडला.आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास घुग्घुसकडून ताडाळी रेल्वे मार्गाने कोळसा घेऊन जाणाऱ्या रेल्वे इंजिनचे रेल्वे हायटेंशन वीज वाहिनी आणि इंजिनला जोडणारा तार (पिंटो) चंद्रपूर- घुग्घुस- वणी महामार्गावरील राजीव रतन चौकातील रेल्वे गेटवर तुटला. त्यामुळे घुग्घुस- वणी महामार्गावरील वाहतूक थांबली. रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घेत तार (पिंटो) जोडण्याच्या कामाला सुरुवात केली. मात्र या कामाला साडेतीन तास लागले. दरम्यान वणी व चंद्रपूर महामार्गावर दोन्ही बाजूंनी दोन कि.मी. पर्यत लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना एक तास लागला. यामुळे अनेक रुग्णवाहिका व एसटी महामंडळाच्या एसट्यांना फटका बसला. या मार्गावरील सर्व बसेस चार तास लेट झाल्या.या रेल्वे मार्गावर कोळसा व सिमेंट वाहतूक दिवसभर चालत असते. त्यामुळे वणी - घुग्घुस महामार्गावरील राजीव रतन चौकातील रेल्वे गेट अनेकदा बंद असते. नेहमीच वणी - चंद्रपूर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागत असतात. मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत होण्याकरिता अर्धा तास वेळ जातो. एखादा गंभीर रुग्ण रुग्णवाहिकेत असला तर त्याच्या जीवही धोक्यात येतो. यासोबतच कामगार व शाळकरी मुलांना चांगलाच फटका बसत असून त्यांना कामावर, शाळेत वेळेवर पोहचता येत नाही. चंद्रपूर- घुग्घुस-वणी मार्गावरील राजीव रतन रेल्वे गेट व घुग्घुस वस्तीच्या पोलीस ठाण्यानजीकच्या रेल्वे गेटवर उड्डाणपूल बांधण्याची मागणी सातत्याने शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे अनेक वर्षापासून केली जात आहे. मात्र या महत्वाच्या व गंभीर विषयाकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. (वार्ताहर)