शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

सिंधबोडीत पर्यटकांची मांदियाळी

By admin | Updated: April 18, 2016 01:09 IST

तालुक्यात समृध्द वनवैभवाची परंपरा आहे. वनविभागातंर्गत कच्चेपार जंगलातील कक्ष क्रमांक १३५ मध्ये सिंधबोडी

सिंदेवाही : तालुक्यात समृध्द वनवैभवाची परंपरा आहे. वनविभागातंर्गत कच्चेपार जंगलातील कक्ष क्रमांक १३५ मध्ये सिंधबोडी तलावाचा परिसर हे एक रमणीय स्थळ आहे. हा परिसर गुढीपाडव्याच्या शुभपर्वावर पर्यटनासाठी खुला करण्यात आला. त्यामुळे या परिसरात पर्यटकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. गुढीपाडव्यापासून या परिसरात शेकडो पर्यटकांनी भेट दिली. सिंदेवाहीपासून सात किलोमीटर अंतरावर कच्चेपारपासून पाच किलोमीटर पूर्वेस अंतरावर सिंधबोडी तलाव आहे. हे ठिकाण जंगलाच्या मध्यभागी असून त्याला लागुन भिवकुंड तलाव आहे. कक्ष क्रमांक १३४ मध्ये मरेगाव, खैरी, मुरपार, चिटकी तलाव असल्याने सिंधबोडी तलावात भरपूर पाण्याचा साठा उपलब्ध आहे. तलावाला लागून डोंगर असल्याने वन्यप्राण्यांच्या वास्तव्यासाठी हा परिसर पोषक आहे. जंगल ४१६ चौरस हेक्टर क्षेत्रात असून सिंधबोडी तलाव १० हेक्टर परिसरात पसरला आहे. परिसरात दहा पट्टेदार वाघ असल्याची नोंद आहे. हरीण, गवा, चितळ, सांबर, निलगाय, बिबट, अस्वल, रानडुकर, तडस आदी प्राण्यांचा मुक्तसंचार आहे. विदेशी पक्षीही मोठ्या प्रमाणात येतात. पर्यटनाच्या दृष्टीकोनातून हा परिसर ताडोबापेक्षा सुंदर असल्याचे मत येथे येणारे पर्यटक व्यक्त करतात. येथील वनविभागाचे वनक्षेत्र अधिकारी वसंत कामडी यांनी या पर्यटनस्थळावर सर्वाधिक परिश्रम घेतले. शासनाने या पर्यटनस्थळाकडे लक्ष देऊन या परिसराचा विकास केल्यास विदर्भात ताडोबानंतर पर्यटक सिंदेवाहीच्या सिंधबोडी पर्यटन स्थळाला नक्की भेट देतील, अशी अपेक्षा आहे. हे पर्यटनस्थळ खुले झाल्यापासून दहा दिवसांत हजारो पर्यटकांनी भेट दिल्याच्या नोंदी आहेत. एफ.डी.सी.एम.ने पर्यटकांसाठी केलेली शुल्क आकारणी कमी करावी, अशी मागणी होत आहे. यामुळे या परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढणार आहे. (शहर प्रतिनिधी)