शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

टोमटा सिंचन योजनेला पंप चाचणीचे ग्रहण

By admin | Updated: December 4, 2014 23:06 IST

गोंडपिंपरी तालुक्यातील २०३४ हेक्टर शेतीला सिंचीत करणाऱ्या सोनापूर टोमटा योजनेचे बांधकाम पुर्ण झाले आहे. मात्र, योजनेसाठी उभारण्यात आलेल्या २२५ अश्वशक्तीच्या चार व्ही. टी. पंपाची यांत्रिकी व

मंगेश भांडेकर - चंद्रपूरगोंडपिंपरी तालुक्यातील २०३४ हेक्टर शेतीला सिंचीत करणाऱ्या सोनापूर टोमटा योजनेचे बांधकाम पुर्ण झाले आहे. मात्र, योजनेसाठी उभारण्यात आलेल्या २२५ अश्वशक्तीच्या चार व्ही. टी. पंपाची यांत्रिकी व जलविद्युत विभागाने चाचणी न केल्याने ही योजना अद्यापही सुरु झालेली नाही.गोंडपिंपरी तालुक्यातील टोमटा गावाजवळील वर्धा नदीच्या डाव्या तिरावर सोनापूर टोमटा उपसा सिंचन योजना आहे. या योजनेला २४ सप्टेंबर १९९१ ला मंजुरी मिळाली. योजनेसाठी ३६४.५० लक्ष रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेलाही यावेळी मंजुरी देण्यात आली. या योजनेचा लाभ सोनापूर, टोमटा, वेडगाव, पोडसा, वेडगाव चक या पाच गावांना होणार आहे.योजनेची सिंचन क्षमता २०३४ हेक्टर असून योजनेच्या मुख्य कामासाठी ६ हेक्टर व वितरणप्रणाली करीता गोंडपिंपरी तालुक्यातील ९७.८१ हेक्टर खाजगी जमीन संपादीत करण्यात आली आहे. रायझींग मेनकरीता ०.३२ हेक्टर जमीन भूसंपादनाचा नवीन प्रस्ताव १५ आॅगस्ट २०१३ ला उपविभागीय अधिकारी (राजस्व) मूल यांना सादर करण्यात आला आहे. योजनेला वनजमीनीची कोणतीही आवश्कता नसून पूनर्वसनाचीही अडचण नाही. तर ही योजना मध्यम सिंचन प्रकल्प असल्याने पर्यावरण मान्यतेचाही प्रश्न मिटला आहे. केंद्रीय जल आयोगाच्या मान्यतेची आवश्यकता नसतानाही या योजनेला १३ आॅक्टोबर २००३ ला केंद्रीय जल आयोगाने मान्यता प्रदान केली आहे.या योजनेतून जून २०१४ पर्यंत २३१४ हेक्टरवर सिंचन क्षमता निर्मीत करण्यात आली आहे. तर टोमटा उप कालवा सा. क्र.५७० मी. वरील बॉक्स कर्ल्व्हटचे बांधकाम न झाल्यामुळे १२७ हेक्टरवर सिंचन क्षमता निर्मीत करण्यात अडचणी आल्या आहेत. या सर्व अडचणींवर मात होत नसल्याने सोनापूर टोमटा योजनेचे काम गेल्या २३ वर्षांपासून रखडले आहे.