शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना आज आॅन दि स्पॉट पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 23:33 IST

चंद्रपूर जिल्ह्यात खरीप कर्ज वाटपासाठी जिल्हा प्रशासनाने थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचा अभिनव प्रयोग सुरु केला असून मंगळवारी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात खरीप पीक कर्ज वाटप मेळावा घेतला जाणार आहे. या मेळाव्यामध्ये सर्व बँकांचे, महसूल विभागाचे, सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार असून त्याच ठिकाणी पीक कर्ज मंजूर केले जाणार आहे. या मेळाव्याला शेतकऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.

ठळक मुद्देप्रशासकीय यंत्रणा सज्ज : जिल्ह्यात १४ ठिकाणी कर्जवाटप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात खरीप कर्ज वाटपासाठी जिल्हा प्रशासनाने थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचा अभिनव प्रयोग सुरु केला असून मंगळवारी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात खरीप पीक कर्ज वाटप मेळावा घेतला जाणार आहे. या मेळाव्यामध्ये सर्व बँकांचे, महसूल विभागाचे, सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार असून त्याच ठिकाणी पीक कर्ज मंजूर केले जाणार आहे. या मेळाव्याला शेतकऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.मंगळवारी राजुरा, गोंडपिंपरी, पोंभूर्णा, कोरपना, चंद्रपूर , वरोरा, भद्रावती, बल्लारपूर, सावली, मूल या सर्व तहसील कार्यालयाच्या ठिकाणी मेळावा होणार आहे. ब्रह्मपुरी येथे तहसील कार्यालयाजवळील पंचायत समिती सभागृहात मेळावा होणार आहे. नागभीड येथे गोविंदराव राजूरकर कला व वाणिज्य महाविद्यालय नागभीड येथे मेळावा होणार आहे. चिमूर येथे स्थानिक शेतकरी भवन, चिमूर सहकारी तांदूळ गिरणी, हजारे पेट्रोल पंप कांपा रोड, चिमूर येथे मेळावा होणार आहे. सिंदेवाही येथील मेळावा राजीव गांधी सभागृह, तहसील कार्यालय येथे होणार आहे.शेतकºयांना या वर्षीच्या खरीप पीक कर्ज वाटपामध्ये कुठलीही अडचण जाऊ नये, बँक व अन्य यंत्रणांकडून पूर्ण सहकार्य मिळावे, यासाठी संपूर्ण प्रशासन आता शेतकºयांच्या भेटीला सज्ज असणार आहे. मंगळवारी प्रत्येक तहसील कार्यालयात शेतकºयांना आवश्यक असणारे पीक कर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयातच पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने यासाठी तयारी केली असून जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी या संदर्भात जिल्हयातील सर्व प्रशासकीय यंत्रणेला सतर्क केले असून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे. सर्व तहसील कार्यालय यंत्रणेशी जिल्हाधिकारी कार्यालयातून संपर्क साधला असून मंगळवारच्या आयोजनासाठी सर्व कार्यालय सज्ज झाले आहेत. शेतकºयांनी तहसील कार्यालयात येताना सातबारा (अद्ययावत) गाव नमुना ८-अ, आधार कार्ड, निवडणूक कार्ड, दोन पासपोर्ट छायाचित्र घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.या मेळाव्याला तहसील कार्यालयामध्ये संबंधित तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, संबंधित तालुक्याचे तहसीलदार, सहायक निबंधक, संवर्ग विकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे गट सचिव, तालुक्यातील संबंधित सर्व राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, सेवा सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. या सर्व यंत्रणेवर जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी स्वत: लक्ष घालणार असून शेतकºयांना कर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. आज होणाºया मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने शेतकºयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - ना. मुनगंटीवारचंद्रपूर जिल्ह्यातील खरीप कर्जवाटपासाठी मंगळवारी १४ तालुक्याच्या ठिकाणी होणाºया मेळाव्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने हा अभिनव प्रयोग केला असून त्यांनी घेतलेल्या पुढाकाराने शेतकऱ्यांनी एक पाऊल पुढे येत प्रतिसाद द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांना या हंगामामध्ये सक्रियपणे आर्थिक मदत व्हावी, योग्य ते पीक घेण्याची त्यांना सुलभता व्हावी, यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने हा पुढाकार घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात मोठ्या संख्येने शेतकºयांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून खरीप पीक कर्जवाटपाचा लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले आहे.