शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आजचे साहित्य उद्याचे क्रांतिपर्वच

By admin | Updated: February 15, 2015 00:44 IST

समाजात जे अत्याचारी असेल, विनाशकारी असेल, त्यांच्यावर साहित्यातून वार केला पाहिजे. रंजल्या गांजल्यांना पुढे आणण्यासाठी, वर आणण्यासाठी साहित्य लेखण व्हायला हवे.

चंद्रपूर : समाजात जे अत्याचारी असेल, विनाशकारी असेल, त्यांच्यावर साहित्यातून वार केला पाहिजे. रंजल्या गांजल्यांना पुढे आणण्यासाठी, वर आणण्यासाठी साहित्य लेखण व्हायला हवे. आजचे साहित्य उद्याचे क्रांतीपर्व ठरणार आहे, असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. विनायक तुमराम यांनी व्यक्त केला. मात्र साहित्यात राजकारण आणू नका. साहित्याने माणसे जोडतात, त्याने माणसे तोडणे शिकवू नका, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच, चंद्रपूरद्वारा आयोजित जिल्हा साहित्य संमेलनाचे शनिवारी दुपारी १२ वाजता येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या सभागृहात थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रसिध्द साहित्यिक डॉ. राजन जयस्वाल होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैैसेकर, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे, महापौर राखी कंचर्लावार, स्थायी समिती सभापती रामू तिवारी, रमेश मामीडवार, संमेलनाचे स्वागताध्यक्ष नगरसेवक संजय वैद्य, सुर्यांशचे अध्यक्ष इरफान शेख उपस्थित होते. यावेळी तुमराम पुढे म्हणाले, आपण प्रारंभी कविता लिहिल्या. मग साहित्यात रस घातला. रंजल्यागांजल्यांच्या जीवनाचा संघर्ष आपल्या साहित्याचा विषय झाला. आपल्याकडे आदिवासी, झाडीबोली, आंबेडकरी यासारखे विविध साहित्य लेखण होत आहे. कोणतेही साहित्य असो, साहित्याचे शेवटचे इप्सित माणसांना जोडणे हेच आहे, हे विसरता कामा नये. माणूस आकाशात पक्ष्यासारखा उडतो, पाण्यात मास्यासारखा पोहतो. मात्र माणसाला माणूसपण शिकविण्याचे काम साहित्य करीत आहे. नवीन कवींवर टिका केली जात आहे. गाजरगवताचे पिक निघाले, असे त्यांना संबोधले जात आहे. त्यामुळे नवोदित कवींनी याचे भान ठेवून काव्यलेखन केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी नवकवींना दिला. अध्यक्षीय भाषण करताना डॉ. राजन जयस्वाल म्हणाले, चंद्रपुरात साहित्यिकांची कमी नाही तशीच साहित्यरसिकांची कमी नाही. मराठी भाषा संपते की काय, असे म्हणत भीतीचा गोळा उठविणाऱ्या माणसांपासून दूर रहा. ११ कोटी लोकांना जी भाषा बोलता येते, त्या भाषेची आपण लेकरं आहोत, याचा अभिमान बाळगला तर न्यूनगंड आपोआपच दूर होईल. मराठीचा जेवढा कोष वाड्:मय आहे, तेवढा कोणत्याही भाषेचा नाही. निसर्ग आपल्या आयुष्याशी कसे नाते साधतो, याचे उदाहरण देताना जयस्वाल म्हणाले, ज्याप्रमाणे येथील वर्धा आणि वैनगंगा नदी विविध ठिकाणाहून प्रवाहित होऊन एकमेकांना मिळतात व तिथे आपले नाव सोडून प्राणहिता नावाने पुन्हा प्रवाहित होतात, तसेच आपल्या आयुष्याचे आहे. आयुष्याचा प्रवासही तसाच आहे. झाडीपट्टीतील नाट्यलेखण उपेक्षित राहिल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. वडसा, देसाईगंज या ठिकाणी दरवर्षी दोनशे नाटकं लिहिली जातात. पाच कोटींची उलाढाल होते. मात्र ही नाटकं प्रकाशित केली जात नाही. समाजात साहित्याचे महत्त्व मोठे आहे. साहित्यातून त्या प्रदेशाची संस्कृती कळते. आपणही बालपणांपासून विविध साहित्यिकांची पुस्तके वाचली आहे. या साहित्यांचा आपल्या आयुष्यावरही सकारात्मक परिणाम झाला असल्याचे मनोगत जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांनी व्यक्त केले. यावेळी शांतराम पोटदुखे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. स्वागताध्यक्ष संजय वैद्य यांनी संमेलनाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. संचालन गिता देव्हारे व तनुजा बोढाले यांनी केले. (शहर प्रतिनिधी)कुल नाही आणि गुरूही नाहीगडचिरोली येथील नव्या विद्यापिठाला गोंडवाना विद्यापीठ असे नाव दिले. आदिवासी बांधवांसाठी ही सन्मानाची बाब आहे. मात्र आदिवासी बांधवांमध्ये क्षमता असतानाही त्यांना कुलगुरू पद बहाल केले नाही. दुसऱ्यांदा तरी या विद्यापिठात आदिवासीला कुलगुरू पद देऊन आदिवासींना न्याय दिला जाईल, असे वाटले होते. मात्र दुसऱ्यांदाही हा मान इतरांनाच देण्यात आला. आदिवासींना कुलही होऊ दिले नाही आणि गुरूही होऊ दिले नाही, अशी खंत यावेळी डॉ. विनायक तुमराम यांनी व्यक्त केली. चंद्रपुरातील रसिकांची प्रशंसाचंद्रपुरात दोनदा अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले. या दोन्ही संमेलनात चंद्रपुरातील रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सारस्वतांचा जोश वाढविला. या संमेलनांचे अध्यक्ष वामन चोरघडे व वसंत आबाजी डहाके हे चंद्रपूरच्या रसिकतेने भारावून गेले होते. त्यांनी येथील साहित्यरसिकांची जाहीरपणे प्रशंसा केल्याची माहिती डॉ. राजन जयस्वाल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिली.