शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून काँग्रेस-राकॉची संयुक्त किसान संघर्ष यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2017 00:26 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे आश्वासन देवूनही प्रत्यक्षात मात्र त्याकडे पाठ फिरविणाऱ्या राज्यातील भाजपा सरकारच्या विरोधात विरोधक एकत्रित आले आहेत.

कर्जमुक्तीसाठी पाऊल : ९२ विरोधी आमदारांचा सहभाग चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे आश्वासन देवूनही प्रत्यक्षात मात्र त्याकडे पाठ फिरविणाऱ्या राज्यातील भाजपा सरकारच्या विरोधात विरोधक एकत्रित आले आहेत. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रसने संयुक्त किसान संघर्ष यात्रा काढण्याचे ठरविले असून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अर्थात २९ मार्चला सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव जाठ येथून ही यात्रा निघणार आहे.सहा दिवसांची ही संघर्ष यात्रा विदर्भात फिरून पनवेल येथे समाप्त होणार आहे. यात्रेचा हा पहिला टप्पा असून यात काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रस पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, रिपाई मिळून एकूण ९२ आमदार सहभागी होत असल्याची माहिती विधानसभेतील काँग्रसचे उप गटनेते तथा आमदार विजय वड़ेट्टीवार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, या यात्रेत माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राकाँ नेते धनंजय मुंडे, अजित पवार, सुनील तटकरे आदी प्रामुख्याने सहभागी होणार आहेत. तीन टप्प्यात सहा-सहा दिवसांची ही संर्घष यात्रा राहणार असून राज्यातील १५० विधानसभा क्षेत्रात फिरून शेतकऱ्यांच्या भेटी घेणार आहे. या दरम्यान राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेवर ही मंडळी प्रकाश टाकणार आहेत. पहिल्या टप्प्यात चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, नागपूर, अमरावती आदी जिल्ह्यातून ही संघर्ष यात्रा जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात सिंधुदुर्ग येथून या यात्रेला प्रारंभ होणार आहे. सरकारवर टीका करताना आमदार वडेट्टीवार म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणणारे सरकार आता आपल्या भूमिकेपासून माघारले. त्याचा निषेध करणाऱ्या आमदारांना निलंबित करून आवाज दडपण्याचा प्रयत्न सरकारने केला. विरोधी बाकावर असताना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार विरोधी बाकावर असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक लाख स्वाक्षऱ्यांचे निवेदन सरकारला पाठविले होते. आता ही मंडळी सरकारात असताना आपली भूमिका का विसरत आहेत, असा टोलाही त्यांनी मारला. पत्रकार परिषदेला माजी आमदार सुभाष धोटे, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, आसावरी देवतळे, रजनी हजारे आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)