शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा कोटींचा करमणूक कर थकीत

By admin | Updated: December 31, 2014 23:21 IST

मनोरंजनाचे प्रभावी साधन म्हणून दूरचित्रवाहिन्यांना महत्व आहे. करमणूकीच्या माध्यमातून शासनाला लाखो रुपयांचा महसूल मिळत असते. मात्र, केबल आॅपरेटच्या करबुडीत धोरणामुळे

४३२ केबल आॅपरेटर : नोटीस बजावूनही करमणूक कर भरण्यास दुर्लक्ष चंद्रपूर : मनोरंजनाचे प्रभावी साधन म्हणून दूरचित्रवाहिन्यांना महत्व आहे. करमणूकीच्या माध्यमातून शासनाला लाखो रुपयांचा महसूल मिळत असते. मात्र, केबल आॅपरेटच्या करबुडीत धोरणामुळे शासनाला लाखो रुपयांचा फटका बसत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ४३२ केबल आॅपरेटरकडे तब्बल सव्वा कोटी रुपयांचा कर थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. कर भरण्यासाठी केबल आॅपरेटरना जिल्हा करमणूक विभागाने नोटीस बजावले आहेत. मात्र, या नोटीसांना न जुमानता कर भरण्यास दिरंगाई केली जात आहे. राज्य शासनाकडून चालू वर्षात चंद्रपूर जिल्ह्याला ५ कोटी रुपयांचे करमणूक कर वसूल करण्याचे उद्दीष्ट दिले. यापैकी २ कोटी ६५ लाख ७९ हजार रुपये वसूल करण्यात आले आहे.चंद्रपूर जिल्ह्यात १५ तालुक्यात ४३२ केबल आॅपरेटर आहेत. या केबल आॅपरेटरकडे ९९ हजार १९४ ग्राहक आहेत. तर ३३ हजार ८१३ हे डीटीएच जोडणीचे ग्राहक आहेत. ग्राहकांकडून नियमीत शुल्क घेऊनही केबल आॅपरेटर मात्र करमणूक विभागाकडे कर भरण्यास दुर्लक्ष करीत आहेत. कर थकीत ठेवणाऱ्यांमध्ये काही प्रतिष्ठित व्यक्तीचा समावेश आहे. त्यामुळे करमणूक विभागाचे अधिकारीही कर थकीत ठेवणाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करता केवळ त्यांना नोटीस बजावण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे आॅपरेटरची मनमानी सुरु आहे. (स्थानिक प्रतिनिधी)