शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बुरुड कामगारांवर उपासमारीची वेळ

By admin | Updated: July 26, 2015 01:40 IST

गडचांदूर, कोरपना, कोठारी येथील बुरुड कामगार हिरव्या बांबूपासून कलाकुसरीच्या विविध वस्तू तयार करण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय करीत आहेत.

अशोक डोईफोडे  गडचांदूरगडचांदूर, कोरपना, कोठारी येथील बुरुड कामगार हिरव्या बांबूपासून कलाकुसरीच्या विविध वस्तू तयार करण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय करीत आहेत. लोकांच्या आवश्यक गरजा पूर्ण करुन आपले व आपल्या मुलाबाळांचे पालनपोषण करण्याचे काम करीत आहे. परंतु त्यासाठी लागणारी मुख्य संपत्ती म्हणजे हिरवा बांबू होय. हिरवा बांबू मिळविण्यासाठी बुरुड कामगारांना मोठा संघर्ष करावा लागत आहे व अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या सर्व प्रकारामुळे बुरूड समाजावर उपासमारीची पाळी आली आहे.बुरुड कामगारांना बांबूपासून काम करण्यासाठी सरळ ठोकळ व हिरव्या बांबूची आवश्यकता असते. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील वनविभागात ठोकळ व सरळ बांबू उपलब्ध नसल्यामुळे अनेक वर्षांपासून बारिक स्वरुपाचा निकृष्ठ दर्जाचा बांबू पुरवठा करण्यात येत आहे. यातून बुरुड कामगारांची दिशाभूल करण्यात येत आहे. यामुळे बुरुड कामगारांच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वनविभागाच्या चुकीच्या धोरणामुळे बुरुड कामगारांची प्रगतीऐवजी दुर्गतीकडे वाटचाल होताना दिसत आहे. निकृष्ट दर्जाच्या बांबू पुरवठ्यामुळे बुरुड कामगारावर उपासमारीची पाळी येण्याची शक्यता आहे. बुरुड कामगारांना चंद्रपूर जिल्ह्यातील वनविभागातील बांबू पुरवठा करण्याऐवजी आलापल्ली व भामरागड वनविभागातील सरळ व ठोकळ हिरवा बांबू पुरवठा करण्याची मागणी बुरुड कामगारांनी केली आहे.निस्तार बांबूचे दर कमी करावाढत्या महागाईमुळे दिवसेंदिवस बुरुड कामगार नैराश्येच्या वातावरणात पसरताना दिसत आहे. त्यांना शासनाकडून कोणत्याच प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे व बांबू दरामध्ये दुप्पट वाढ केल्याने बुरुड कामगारांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. १० रुपयांचा बांबू २० रुपये व २० रुपयांचा बांबू ४० रुपये प्रति नग याप्रमाणे विकत घ्यावा लागत आहे. कधी कधी विकत घेतलेल्या बांबूपासून काम केल्यानंतर बांबूची मुद्दल किंमत वसूल होत नाही व एवढा महागडा बांबू विकत घेणे त्यांना परवडत नसल्यामुळे काय करावे, असा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित होत आहे. एवढा मोठा कुटुंबाचा गाडा कसा चालवावा, असा विचार त्यांच्या मनात सतत असतो. बांबूच्या दरात दुप्पट वाढ केल्याने बुरुड कामगारांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्यामुळे बांबूचे दर तात्काळ कमी करावे अशी मागणी आहे.बुरुड कामगारांना बांबूपासून काम करण्यासाठी हिरवा व ताजा बांबूची गरज पडत असते. परंतु अनेक वर्षांपासून वनविभागाकडून वर्षाला एकदा बांबू पुरवठा केला जात आहे व तोच बांबू वर्षभर बुरुड कामगारांना विकला जात आहे. वनविभागाने गोदाम तयार करावेबांबू सुरक्षित ठेवण्यासाठी वनविभागाकडे कोणत्याही प्रकारची पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे निस्तार बांबू वनविभागाच्या खुल्या जागेवर टाकला जातो. त्या बांबूंची काळजी वन अधिकाऱ्यांकडून घेतली जात नसल्यामुळे दरवर्षी पाळ्यामुळे हजारो बांबू खराब होतात. यात शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होते. पर्यायाने बुरुड कामगारांचेसुद्धा नुकसान होते. वनविभागाच्या दुर्लक्षेमुळे बुरड कामगारांना पावसाळ्यात बांबूपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे बांबू सुरक्षित ठेवण्यासाठी गोदाम किंवा शेड तयार करावे व बुरुड कामगारांना बाराही महिने हिरवा बांबूचा तुटवडा पडू नये, याची दखल घेण्यात यावी, अशी मागणी आहे.मागणीनुसारच निस्तार बांबूचा पुरवठा करावाबुरुड कामगारांना ऐन पावसाळ्याच्या तोंडावर आवश्यकतेपेक्षा जास्त बांंबु एकाच वेळी पुरवठा केला जातो. त्यामुळे बुरुड कामगार आपल्या ऐपतीनुसार बांबू विकत घेतो. जास्तीचा बांबू एकाच वेळी विकत घेऊ शकत नसल्यामुळे बांबू शिल्लक पडतो. तो खराब होऊन सडतो. यात शासनाचे नुकसान होते. वनविभागातर्फे बुरुड कामगारांना बांबूची गरज नाही, असे गृहित धरले जाते व बांबू रजिस्टवर स्टाक दाखविला जातो. वनविभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे बुरुड कामगारांना हिरव्या बांबूपासून वंचित राहावे लागते व कित्येक महिने बांबूची वाट पाहावी लागते. बांबूसाठी संघर्ष करावा लागतो. यासाठी बुरुड कामागरांंच्या मागणीनुसार बांबूचा पुरवठा करणे गरजेचे आहे.निस्तार बांबू ठेकेदारांना देऊ नयेबुरुड कामगारांना पुरवठा करण्यात येणारा बांबू शेतकऱ्यांना किंवा इतर ठेकेदारांना दिल्यास त्याचा गैरफायदा वाटप करणारे अधिकारी घेतात. शेतकऱ्यांना व ठेकेदारांना ज्यादा दराने बांबु विकतात व लाखो रुपयांची कमाई करतात. अशा अनेक तक्रारी यापूर्वीच बुरुड कामगारांकडून करण्यात आल्या आहेत. यामध्ये बांबु वाटप करणारे अधिकारी उत्तम दर्जाचा बांबू ठेकेदारांना विकतात व बारीक बांबू बुरुड कामगारांना देतात. यात बुरुड कामगाराची मरमर होताना दिसते. तेव्हा बुरुड कामगारांचा बांबु इतारांना देण्यात येऊ नये. इतरांसाठी वेगळ्या बांबूची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी आहे.