शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबा अंधारी प्रकल्पातील वाघ ‘लय भारी’

By admin | Updated: November 30, 2015 01:02 IST

तंत्रज्ञानाने कोणीही प्रगती केली तरी निसर्ग-निसर्ग असतो. निसर्गावर कुणी मात करू शकत नाही. आजच्या धकाधकीच्या जीवनात नैसर्गिक सौदर्य मनाला मोहून टाकते.

सपत्निक जंगल भ्रमंती : गोलंदाज वरुण अ‍ॅरानची लोकमतशी बातचितराजकुमार चुनारकर खडसंगीतंत्रज्ञानाने कोणीही प्रगती केली तरी निसर्ग-निसर्ग असतो. निसर्गावर कुणी मात करू शकत नाही. आजच्या धकाधकीच्या जीवनात नैसर्गिक सौदर्य मनाला मोहून टाकते. त्यामुळे निसर्गाची आवड सर्वांना असते. म्हणूनच नागपूरची कसोटी लवकर संपल्याने देशातील प्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ ‘लय भारी’ असल्याची प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट टिमचे मध्यमगती गोलंदाज वरून अ‍ॅरान यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर असुन नागपूर येथील विदर्भ क्रिकेटच्या जामठा स्टेडियमवर तिसरी कसोटी २५ ते २९ नोव्हेंबरदरम्यान खेळली गेली. या कसोटीचा निर्णय तिन दिवसातच भारताच्या बाजूने लागल्याने विजयाच्या आनंदासह भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी जंगलभ्रमंतीचा आनंद लुटला. भारतीय संघाचा मध्यमगती गोलंदाज वरून अ‍ॅरान रविवारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीसाठी चिमूर तालुक्यातील कोलारा गेटवर आला असता त्याने ‘लोकमत’शी बातचीत केली. मूळचा झारखंड राज्यातील जमशेटपूर येथील २७ वर्षीय वरुण रेमॅन्ड अ‍ॅरान याने भारतीय कसोटी संघात २२ नोव्हेंबर २०११ ला वेस्ट इंडिजसोबत पहिली कसोटी खेळली. नागपूर कसोटीच्या विजयानंतर दोन दिवसाचा वेळ असल्याने मी माझ्या परिवारासह ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी आलो. सकाळी ६.०० वाजता जंगल सफारी केली असता ताडोबातील वाघाचे प्रथमच दर्शन झाले. सोबतच हरिण, सांबर व वेगवेगळ्या प्रकाराचे प्राणी पाहावयास मिळाल्याचे त्याने सांगितले. शासनाच्या ‘वाघ बचाओ मोहिमे’बाबत विचारले असता, वाघ वाचायलाच पाहिजे. त्यासाठी माझ्याकडून जे करता येईल ते करण्यास मी सदैव तयार आहे. पर्यावरण वाचवण्याच्या दृष्टीने मी सध्या बंगलोर येथील पर्यावरण संस्थेशी जुळला असल्याची माहितीही त्याने यावेळी दिली. नागपूर कसोटी सामन्याच्या विजयाबाबत वरुण अ‍ॅरानला बोलते करण्याचा प्रयत्न केला असता, क्रिकेट विषयी बोलण्याचे टाळत बीसीसीआईची आचारसंहिता असल्याने क्रिकेटबाबत कुठल्याही मुद्यावर त्याने बोलणे टाळले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व इतर वातावरणाने भारावलो. त्यामुळे आणखी एखादी संधी मिळाल्यास या व्याघ्र प्रकल्पास भेट नक्की देईन, असे तो म्हणाला. याच गेटवरून सलामी फलंदाज मुरली विजय याने जंगलभ्रमंती केली. मात्र त्याने माध्यमापासून दूर राहणे पसंत केले.