शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

टेमुर्डा परिसरात वाघाचे वास्तव्य

By admin | Updated: December 27, 2014 22:47 IST

तालुक्यातील टेमुर्डा परिसरातील जंगलात मागील एक महिन्यापासून वाघाने आपले बस्तान मांडले आहे. तीन दिवसांपूर्वी तर नागपूर-चंद्रपूर मार्गावर अनेकांना वाघाचे दर्शन झाले. त्यानंतरही अनेकदा वाघाने

वरोरा : तालुक्यातील टेमुर्डा परिसरातील जंगलात मागील एक महिन्यापासून वाघाने आपले बस्तान मांडले आहे. तीन दिवसांपूर्वी तर नागपूर-चंद्रपूर मार्गावर अनेकांना वाघाचे दर्शन झाले. त्यानंतरही अनेकदा वाघाने दर्शन दिल्याने वनविभाग सतर्क झाला असून याच परिसरात वाघाचे पगमार्ग आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिक भयभित झाले आहे. वरोरा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या टेमुर्डा वनपरिमंडळ, क्षेत्र क्रमांक सातमध्ये टेमुर्डा, रामपूर, मांगली, बोरगाव (शि), फत्तापूर, मांडवघोराड, वडधा सोसायटी आदी गावांचा समावेश आहे. या गावालगत मोठ्या प्रमाणात जंगलही आहे. या जंगलात वनविभागाने काही दिवसांपूर्वी दोन पानवठे व गवताचे रान तयार केले आहे. पानवठे असल्याने या जंग़लात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचे वास्तव्य वाढले आहे. याच परिसरात मागील एक महिन्यापासून वाघाने बस्तान मांडले आहे. काही ग्रामस्थांना याच वाघाने दर्शनही दिल्याची माहिती वनविभागाला मिळताच विभागाने सदर परिसरात लक्ष ठेवणे सुरू केले आहे. वाघाने या परिसरात पगमार्ग आढळून आले असून त्याचे वय दोन वर्ष असल्याची माहिती सुत्रांनी दिली. ताडोबा अभयारण्यातून वाघ भटकलेला असून त्याला या परिसरात पानवठ्यामुळे इतर वन्यप्राणी आढळत असून ते त्याचे खाद्य झाल्याने या वाघाने बस्तान मांडण्याची शक्यता आहे. वाघाने अद्याप मानव व गुरावर हल्ला केला नाही. परंतु वाघाच्या अस्तित्व असलेल्या जंगलात जाणे धोक्याचे झाले आहे. एका वाघाला ४० किमी जंगलाचा परिघ असलेल्या जागेची आवश्यकता असते. २४ डिसेंबरला टेमुर्डा गावाजवळील नागपूर- चंद्रपूर मार्गावर अनेकांनी वाघ रस्ता ओलांडताना बघितला. वाहने जागेवर थांबवून वाघाचे दर्शन घेण्याचा आनंद नागरिकांनी लुटला असला तरी जंगल परिसरातील गावामध्ये असलेल्या नागरिकांमध्ये दहशत आहे. (तालुका प्रतिनिधी)