शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बनावट खत विक्रीप्रकरणी आणखी तिघांना अटक

By admin | Updated: April 30, 2016 00:49 IST

तालुक्यात सन २०१३ ला अमरावतीच्या एका कंपनीने शेकडो शेतकऱ्यांना बनावट खत विकण्याचा गोरखधंदा सुरू केला होता.

दोन दिवसांची पोलीस कोठडी : यापूर्वी दोघांना झाली होती अटकब्रह्मपुरी : तालुक्यात सन २०१३ ला अमरावतीच्या एका कंपनीने शेकडो शेतकऱ्यांना बनावट खत विकण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रकरण दाबल्या गेले. परंतु काही सामाजिक कार्यकर्ते व विधानसभेत प्रश्न उपस्थित झाल्याने हे प्रकरण पुन्हा उजेडात आले असून अशोक पंजाबराव दहिकर, शशीकांत प्रभाकर लकडे, माधव प्रभाकर निमकर रा. अमरावती या तिघांना गुरुवारी अटक करण्यात आली. तिघांनाही न्यायालयातून पोलीस कोठडी मिळाली आहे.सन २०१३ मध्ये अमरावतीच्या कंपनीने काही गट तयार केले व या परीक्षेत्रातील काही शेतकऱ्यांना पकडून रासायनिक खते असल्याची बतावणी करुन खताची विक्री केली. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झाली. शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी कंपनीविरुद्ध कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तत्कालिन कृषी अधिकारी इनायत शेख यांनी १३ डिसेंबर २०१३ रोजी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. ब्रह्मपुरीे पोलीस ठाण्याचे तत्कालिन ठाणेदार यांनी कुठलीही चौकशी न करता प्रकरणाचा गाशा गुंडाळला होता. त्यानंतर काही सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी सदर प्रकरण उचलून धरला होता व विधानसभेत तारांकित प्रश्नावली करण्यास भाग पाडले. त्यानुसार हे प्रकरण २०१५ मध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा चंद्रपूर यांच्याकडे वर्ग करण्यात आले. या शाखेने चार महिन्यापूर्वी गिरीश चालखुरे आणि महेश हरडे या दोन आरोपींना अटक करुन पोलीस कोठडीत घेतले होते. अटकेत असलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीच्या अधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा चंद्रपूरने अमरावती येथे जावून अशोक पंजाबराव दहिकर, कंपनीचे मालक शशीकांत प्रभाकर लकडे, संचालक माधव प्रभाकर निमकर रा. तिवसा यांना गुरुवारी अटक केली व रात्री ९ वाजता ब्रह्मपुरीच्या न्यायालयात हजर केले. न्यायाधीश के.के. चाफले यांनी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकूण तिघांनाही ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. (तालुका प्रतिनिधी)