शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

असहकार आंदोलन करणाऱ्यांना धमक्या

By admin | Updated: July 21, 2014 23:47 IST

राज्य पशुव्यवसाय संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या असहकार आंदोलनात जिल्ह्यातील सर्व पशुधन पर्यवेक्षक, सहायक पशुधन विकास अधिकारी यांनी सहभाग घेऊन अहवाल बंद व असहकार आंदोलन

चंद्रपूर : राज्य पशुव्यवसाय संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या असहकार आंदोलनात जिल्ह्यातील सर्व पशुधन पर्यवेक्षक, सहायक पशुधन विकास अधिकारी यांनी सहभाग घेऊन अहवाल बंद व असहकार आंदोलन १० जून पासून सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांनी अहवाल बंद केल्याने अधिकाऱ्यांचे कामाचे आकडे वरिष्ठांकडे जाणे बंद आहे. त्यामुळे पशुसंवर्धन अधिकारी प्रत्येक तालुक्यात बैठका घेऊन कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी देत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.जिल्ह्यातील एल.डी.ओ. पेक्षा जास्त काम पशुधन पर्यवेक्षकांचे आहे. परंतु, त्यांच्या कामाची चीज होत नाही. पशुधन पर्यवेक्षकांना डावलल्या जाते. पर्यायाने काम कमी झाल्याचा उचपा घेण्याकरिता पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेंद्र देशपांडे धमक्या देत असल्याचे म्हटले आहे. कार्यालयीन कामे न केल्यास किंवा दवाखान्यात औषध, इंजेक्शन वापरल्यास, पशुपालकांना औषधी दिल्यास पोलिसात तक्रार करून कारागृहात टाकू अशी धमकी देत आहे. त्यामुळे पशुधन पर्यवेक्षकांत धास्ती निर्माण झाल्याचे पत्रकार म्हटले आहे. प्रलंबित मागण्यांसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू असताना वरिष्ठ अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करून अधिनिष्ठ कर्मचाऱ्यांना धमक्या देणे अयोग्य आहे. पशुसंवर्धन अधिकाऱ्याच्या विरोधात संघटना उठाव करून त्यांची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष प्रवीण भुसारी यांनी दिला आहे. (नगर प्रतिनिधी)