शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

गांगलवाडी गाव उद्ध्वस्त करण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 23:28 IST

ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी येथील पंचायत समिती सदस्य सुनिता ठक्कर यांच्या घरासमोर अज्ञात व्यक्तींनी धमकीपत्र दगडाला बांधून फेकले. यात पत्रात गांगलवाडीतील संपूर्ण घरे, दुकाने पेटवून देऊ व गाव उद्ध्वस्त करू, अशी धमकी देण्यात आली आहे. एखाद्या माथेफिरुने केलेला हा प्रकार असला तरी गावकऱ्यांनी पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे.

ठळक मुद्देपोलीस बंदोबस्ताची मागणी : पं.स. सदस्याच्या घरासमोर निनावी पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी येथील पंचायत समिती सदस्य सुनिता ठक्कर यांच्या घरासमोर अज्ञात व्यक्तींनी धमकीपत्र दगडाला बांधून फेकले. यात पत्रात गांगलवाडीतील संपूर्ण घरे, दुकाने पेटवून देऊ व गाव उद्ध्वस्त करू, अशी धमकी देण्यात आली आहे. एखाद्या माथेफिरुने केलेला हा प्रकार असला तरी गावकऱ्यांनी पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे.रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास पंचायत समिती सदस्य सुनिता ठक्कर यांचा मुलगा हा घरा शेजारी असलेल्या आपल्या राईस मिलकडे जाण्यासाठी निघाला असता त्याला गेटवरच हे निनावी तीन पत्रे आढळली. यात आम्ही गडचिरोली येथून चार-पाच ट्रॅक भरुन लोक गांगलवाडीत येऊ व सर्व दुकाने, घरे पेटवून टाकू. तसेच चोरीही करून निघून जाऊ, ज्यांना बोलवायचे असेल त्यांना बोलवून घ्या, पोलिसांनाही बोलवा, असे हिंदी भाषेत या पत्रात नमूद केले आहे.या निनावी धमकीपत्राने गांगलवाडी तसेच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर घटनेची माहिती ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळ गाठून सदर निनावी धमकीपत्राच्या जागेचा पंचनामा करुन पत्र आपल्या ताब्यात घेतली आहेत.