शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

हजारों आदिवासींनी केले ठाकूरदेवांना नमन

By admin | Updated: January 8, 2016 02:07 IST

एटापल्ली तालुक्यात लोह खनिजाच्या साठ्यांमुळे प्रसिद्धीला आलेल्या सूरजागड पहाडीवर आदिवासींचे आराध्य दैवत ठाकूरदेवांचे देवस्थान आहे.

सूरजागड दसरा यात्रा उत्सव : छत्तीसगडसह जिल्ह्याच्या दक्षिण भागातून नागरिकांची हजेरीएटापल्ली : एटापल्ली तालुक्यात लोह खनिजाच्या साठ्यांमुळे प्रसिद्धीला आलेल्या सूरजागड पहाडीवर आदिवासींचे आराध्य दैवत ठाकूरदेवांचे देवस्थान आहे. येथे दरवर्षी ५ ते ७ जानेवारी या कालावधीत यात्रा उत्सव साजरा केला जातो. या यात्रेसाठी अहेरी, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा तालुक्यासह छत्तीसगड राज्यातून हजारो भाविक सहभागी होतात.पहिल्या दिवशी संपूर्ण सूरजागड पहाडीवर नागरिक जमा होऊन मुक्काम करतात. दुसऱ्या दिवशी पाटील, भूमिया व पुजाऱ्यांच्या नेतृत्वात पहाडीच्या पायथ्याशी मंदिरात अश्वावर विराजमान असलेल्या ठाकूरदेवाचे दर्शन घेऊन आदिवासी बांधव पहाडीवर चढाई करण्यासाठी निघतात. ५ ते ६ किमी वर चढून ठाकूरदेवांची पूजा केली जाते. काही भाविक पहाडीच्या पायथ्याशी विराजमान ठाकूरदेवाला पशु बळीही देऊन आपला नवस फेडतात. मुक्कामाच्या दरम्यान रात्रीच्या वेळी रेला नृत्य, पथनाट्य तथा जनजागृती कार्यक्रमाची मांदियाळी पहावयास मिळते. तिसऱ्या दिवशी परतीचा प्रवास म्हणून भाविक पायथ्याशी असलेल्या ठाकूरदेवाचे दर्शन घेऊन नवीन वर्ष सर्वांना सुखी व आनंदाचे जावो अशी कामना करतात व पुढील वर्षी नवस फेडण्याचे वचन देऊन यात्रेचा निरोप घेतात. यावेळी शासनाकडून यात्रेदरम्यान आरोग्य तपासणी शिबिर, कृषी प्रदर्शन तथा विविध शासकीय योजनांची माहिती देणारे दालन लावण्यात आले होते. तीन दिवशीय यात्रेत हजारो आदिवासींनी ठाकूर देवांसमोर नतमस्तक होऊन आपली कामना व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)