शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

हजारो एकर जमीन सिंचनाखाली येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 23:07 IST

लोंढोली, हरंभा, साखरी, सिर्सी, डोणाळा, काढोळी परिसरामध्ये शेतीच्या सिंचनाचा फार मोठा प्रश्न आहे. परिणामी, धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. ही समस्या सोडविण्यासाठी गोसेखुर्दचे पाणी देण्याची मागणी १३ वर्षांपासून सुरू आहे.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : लोंढोली येथील बैठकीत नागरिकांना दिले आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कसावली : लोंढोली, हरंभा, साखरी, सिर्सी, डोणाळा, काढोळी परिसरामध्ये शेतीच्या सिंचनाचा फार मोठा प्रश्न आहे. परिणामी, धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. ही समस्या सोडविण्यासाठी गोसेखुर्दचे पाणी देण्याची मागणी १३ वर्षांपासून सुरू आहे. प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यासाठी १०० कोटींची निविदा काढण्यात आली. यातून कामे पूर्ण होतील आणि हजारो एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी लोंढोली येथील बैठकीत दिली. यावेळी वन व सिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.परिसरातील गावांना पाणी मिळणार की नाही असा प्रश्न नागरिकांकडून सतत विचारला जात होता. त्यामुळे ४०० ते ५०० शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. यावेळी आ. वडेट्टीवार यांनी प्रकल्प आणि शेतीचा नकाशा दाखवून शेतकºयांना आश्वास्त केले. १०० टक्के पाणी मिळेल. कामाची सुरुवात केलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत पुढच्या वर्षी हजारो एकर सिंचनाखाली, अशी ग्वाही दिली. दरम्यान, सिंचन विभागातील अधिकाºयांनीही गोसेखुर्द प्रकल्पाची शेतकºयांनी माहिती दिली. वाघोली बुटी सिंचन प्रकल्पामुळे अनेक शेतकºयांना पाणी मिळत नाही. शेकडो शेतकºयांना वंचित राहावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये शेती वाचविण्याकरीता पुढील वर्षी कोणत्याही परिस्थितीत हे गाव वाघोली बुटी सिंचन प्रकल्पापासून बाजुला केल्या जाईल. वाघोली बुटी लिफ्ट इरिगेशन योजना सुरू न करता थेट त्याच कालव्यात गोसेखुर्दचे पाणी टाकून शेतकºयांची सिंचनाखाली आणू, अशी माहिती विधानसभा विरोधी पक्षनेते आ. वडेट्टीवार यांनी दिली. यावेळी उपस्थित शेतकºयांनी परिसरातील विविध समस्यांकडे लक्ष वेधले. सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यशवंत बोरकुटे जि. प. चे माजी बांधकाम सभापती, दिनेश चिटनूरवार, माजी प. स. सभापती, राकेश गड्डमवार, लोंढोलीच्या सरपंच लता कोमलवार, उपसरपंच दिलीप लटारे, मनोज खोबे, शंकर बोदलकर, मदन दुर्गे, भाऊजी बोदलकर, दिलीप गोवर्धन, पुंडलीक कुकडे, देवेन्द्र खोबे, गणेश भांडेकर, अर्चना भोयर, संगीता खोबे, शिला म्हशाखेत्री, आशिष मनबततुलवार, मुन्ना भांडेकर, मोहन कुनघाडकर, प्रवीण संतोषवार, आदींसह नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.समस्यांकडे वेधले लक्षसावली तालुक्यातील प्रलंबित समस्यांचा निपटारा करण्याची मागणी नागरिकांनी विरोधी पक्षनेते आ. वडेट्टीवार यांच्याकडे केली. सिंचनाअभावी शेतीचे कसे नुकसान होत आहे, याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. पाणी नसल्याने धानाचे उत्पादन घटले. त्यामुळे पुढील हंगामात हा प्रश्न सोडविण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी यावेळी केली.