शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आरोपींना पोलिसांचे अभय

By admin | Updated: July 21, 2014 23:45 IST

स्मार्ट व्हॅल्यू प्रोडक्ट अ‍ॅन्ड सर्व्हिस लिमिटेड आणि एपीएलएल या दोन कंपन्यांच्या दलालांकडून चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास १५० ते २०० विद्यार्थ्यांची आर्थिक व शैक्षणिक फसवणूक झाली आहे.

एपीएलएलचे दलाल मोकाटच : गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळगडचांदूर : स्मार्ट व्हॅल्यू प्रोडक्ट अ‍ॅन्ड सर्व्हिस लिमिटेड आणि एपीएलएल या दोन कंपन्यांच्या दलालांकडून चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास १५० ते २०० विद्यार्थ्यांची आर्थिक व शैक्षणिक फसवणूक झाली आहे. याविरोधात विद्यार्थ्यांनी संघटन करून दलालांविरोधात चार महिन्यांपूर्वी तक्रार दाखल केली. मात्र पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. सदर दलालांनी शिक्षण देऊन आयटीची पदविका देण्याचे आश्वासन प्रवेश घेतेवेळी विद्यार्थ्यांना दिले होते. माात्र या कंपन्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण न देता विद्यार्थ्यांचे वर्ष वाया घालविले आहे. आर्थिक व मानसिक शोषण केल्याप्रकरणी विद्यार्थ्यांनी गडचांदूर पोलीस ठाण्यात चार महिन्यांपूर्वी तक्रार दाखल केली होती. आरोपींची नावे व फोटो पोलिसांना प्राप्त झाले असून आरोपींच्या ठिकाणांचा पत्ताही माहित असताना अजूनही पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला नसल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.स्मार्ट व्हॅल्यू प्रोडक्ट अ‍ॅन्ड सर्व्हिस लिमिटेड या नावाने आठ हजार ७९९ रुपयांचा डि.डी. काढून विद्यार्थ्यांना आय.टी. चा डिप्लोमा देण्यात येणार होता. म्हणून गडचांदूर, राजुरा, जिवती, कोरपना, नांदाफाटा, लखमापूर, पिंंपळगाव, हरदोना, मानोली, सोनुर्ली, नारंडा, लोणी, कळमना, चिंचोली, तळोधी, खिर्डी, कवठाळा व परिसरातील इतर गावातील विद्यार्थ्यांनी आय.टी. शिक्षणाचा डिप्लोमा मिळविण्यासाठी प्रवेश घेतला. मात्र प्रवेशाच्यावेळी दिलेले एकही आश्वासन पूर्ण न करता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षसुद्धा वाया घालविले.सदर कंपनीचे दलाल अतुल कोहपरे, संजय निमगडे, सचिन मडावी, हेमंत कुळसंगे, अर्जून आलाम, समय्या पनेट्टीवार यांनी विद्यार्थ्यांकडून डी.डी. काढून घेतल्यानंतर गडचांदूर येथील गौस सिद्दीकी यांच्या ब्लॉसम कॅम्प्यूटर इंन्स्टीट्यूटशी करार करून विद्यार्थ्यांना तिथे शिक्षण देण्याचे ठरविण्यात आले. सिद्दीकी यांना त्याचा मोबदला मिळणार होता. मात्र काही दिवस मोबदला देऊन कंपनीने सिद्दीकीला मोबदला देणे बंद केल्याने त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देणे बंद केले. त्यामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक व शैक्षणिक फसवणूक झाली आहे.कंपनीने विद्यार्थ्यांना आय.टी. पदविकेचे महत्त्व पटवून सांगितले. ७० टक्कपेक्षा जास्त गुण घेतल्यास मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कंपनीकडूनच रोजगार मिळवून देण्यात येणार असे सांगण्यात आले होते. शिक्षण देणे बंद केल्यानंतर विद्यार्थ्यांनी वारंवार कंपनीच्या एजेंट लोकांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते ‘तुमच्याने जे होते ते करून घ्या’ म्हणून उडवाउडवीची उत्तरे देत होते. दोन वर्ष गेल्यानंतरही विद्यार्थ्यांना कंपनीकडून साधा फोन सुद्धा आला नाही. तसेच काही मुलांकडून परस्पर पैसे घेऊन त्यांचा डी.डी. न काढता पैसे हडपण्यात आले. एवढेच नाही तर डीडी काढणाऱ्या अनेक मुलांचे एपीएलएलच्या यादीत नावही नसल्याचे समजते.कंपनीने विद्यार्थ्यांची झालेली शैक्षणिक व आर्थिक नुकसान भरपाई करून द्यावी व भविष्यात कोणत्याही विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळू नये म्हणून विद्यार्थ्यांकडे आलेल्या दलालांवर कारवाई व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी गडचांदूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. मात्र अजूूनपर्यंत पोलिसांनी कारवाई का केली नाही हा प्रश्न तक्रारकर्त्यां विद्यार्थ्यांना पडला आहे. (शहर प्रतिनिधी)