शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

वरोरा तालुक्यात शिवभोजन थाळीचे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:29 IST

वरोरा : शहरात शिवभोजन थाळीचा तुटवडा कोरोनाच्या अस्मानी संकटामुळे अनेकांचे रोजगार गेले, तर हातावर पोट असणाऱ्या मजुरांची दैना झाली. ...

वरोरा : शहरात शिवभोजन थाळीचा तुटवडा

कोरोनाच्या अस्मानी संकटामुळे अनेकांचे रोजगार गेले, तर हातावर पोट असणाऱ्या मजुरांची दैना झाली. राज्यात १५ एप्रिलपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. गरिबांना मिळणारी दहा रुपयांची शिवभोजन थाळी एक महिन्याकरिता मोफत देण्यात येणार असल्याची घोषणाही झाली. मात्र, वरोऱ्यात या योजनेचे तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे.

रोजी मंदावली तरी रोटी थांबणार नाही अशी घोषणा शासनाकडून करण्यात आली. नोंदणीकृत सात कोटी लोकांना तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मिळणार असल्याचीही ग्वाही देण्यात आली. शासनाच्यावतीने तसे निर्देश प्रशासनाला देण्यातसुद्धा आले; मात्र दहा दिवस लोटूनही या सर्व घोषणा कागदावरच राहिल्या. अजूनपर्यंत गरिबांच्या दारापर्यंत ना गहू-तांदूळ पोहोचले नाही, शिवथाळी पुरेशा प्रमाणात मिळत आहे. गरिबांच्या पोटाची अवस्था बिकट झाली आहे.

देशात पहिल्या लाॅकडाऊनच्या काळात अनेक सामाजिक संस्थांनी, गरीब आणि कष्टकऱ्यांची भोजनाची व्यवस्था नि:शुल्क केली होती. त्यामुळे पोटाचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटला होता. यावेळी मात्र सामाजिक आणि राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पुढे येताना दिसत नाही. वरोरा शहरामध्ये दोन शिवभोजन केंद्रे आहेत. त्यांची एकूण क्षमता ३०० थाळींची असून, गरजू व्यक्ती त्या ठिकाणी सकाळपासूनच रांगा लावतात. सामाजिक दुरतेचा अभाव आणि बिना मास्क या गरिबांचे संपूर्ण कुटुंब रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अवघ्या पंधरा-वीस मिनिटांतच या थाळ्या संपत असून, बाकीच्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहेत. कोरोनाची ही स्थिती किती काळ राहील हे अनिश्चित असून, आता पोट कसे भरावे या विवंचनेत हे कष्टकरी सापडले आहेत.

क्षमता वाढविण्याची मागणी करणार : तहसीलदार

या संदर्भात तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांना विचारले असता शहरात दोनच केंद्रे असून, त्यांची क्षमता ठरलेली आहे असे ते म्हणाले. त्यांची वाढीव क्षमता जिल्हाधिकारी मंजूर करतात, त्यामुळे यांच्याकडे मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच गरिबांना मिळणारा गहू व तांदूळ अद्याप रेशन दुकानात पोहोचला नसल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासनाकडे मागणी करणार : शिवसेना

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते म्हणाले की, प्रशासन कमी पडत असेल तर शिवसेना आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गरिबांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येईल, तसेच प्रशासनाकडे अतिरिक्त शिवभोजन थाळीची मागणी करण्यात येईल.