शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरात तिसऱ्या दिवशीही मनसेची गांधीगिरी सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2016 00:46 IST

तालुक्यातील जनसामान्याच्या मागण्यासह चिमूर क्रांती जिल्ह्याच्या मागणीसाठी व चैती तुकूम येथील अवैध ...

आमरण उपोषण: प्रशासकीय अधिकाऱ्यांची चर्चा फिस्कटलीचिमूर : तालुक्यातील जनसामान्याच्या मागण्यासह चिमूर क्रांती जिल्ह्याच्या मागणीसाठी व चैती तुकूम येथील अवैध उत्खनास सहकार्य करणाऱ्या अधिकारी यांना निलंबीत करण्याच्या मागणीसाठी मनसेने प्रशासकीय भवनासमोर सोमवारपासून गांधीगिरी आंदोलन सुरु केले. दरम्यान मंगळवारी तहसीलदार संतोष महल्ले व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मनोजकुमार शहा यांनी सायंकाळी उपोषण मंडपाला भेट देवून उपोषणकर्ता सोबत व मनसे तालुकाध्यक्ष प्रशांत कोल्हे यांच्यांशी मागण्याबाबत चर्चा करुन उपोषण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र उपोषणकर्त्याचे समाधान न झाल्याने प्रशासकीय अधिकारी व उपोषणकर्ता मधील चर्चा फिस्कटल्याने बुधवारी तिसऱ्या दिवशीही मनसेची गांधीगिरी सुरुच आहे.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या चैती तुकूम येथील अवैध उत्खनन करुन रॉयल ब्लू रिसोर्टन बांधकाम केले. यामध्ये शासनाचा महसूल बुडाला. याबाबत दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, ले-आऊट धारकांनी नियमाचा भंग करुन ओपन स्पेसची विक्री केली. बोगस अंत्योदय, बीपीएल कार्ड रद्द करावे, महसूल विभागातील फेरफार वेळेत करण्यात यावे, संजय गांधी योजनेच्या मानधनात वाढ करण्यात यावी, यासह जनसामान्यांच्या मागण्या घेवून मनसेने सोमवारपासून आमरण व साखळी उपोषण सुरु केले आहे.उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारला सायंकाळी चिमूरचे तहसीलदार संतोष महल्ले व नगगर परिषदेचे मुख्याधिकारी मनोजकुमार शहा यांनी उपोषण मंडपास भेट देवून उपोषणकर्ताशी त्यांच्या मागण्या संदर्भात चर्चा केली. चर्चा सकारात्मक झाल्याचे प्रशासनातर्फे सांगितले. मात्र उपोषण कर्ताचे समाधान न झाल्याने तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरुच होते. उपोषणकर्ते महेंद्र तोटावार व रमाकांत मेहरकुरे यांनी जोपर्यंत अवैध उत्खनन करणारे रॉयल ब्लू रिसोर्टचे संचालक व शासनाचा महसूल बुडवणारे नायब तहसीलदार विनायक मगर यांना जोपर्यंत निलंबीत करुन चौकशी करणार नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. याच मुद्दयावरील चर्चा फिस्कटल्याने उपोषण तिसऱ्या दिवशी सुरुच आहे. सोमवारपासून मनसेचे चिमूर उपाध्यक्ष महेंद्र तोटावार व रमाकांत मेहरकुरे आमरण उपोषणास बसले आहेत. तर साखळी उपोषणास मनसेचे शहर अध्यक्ष नितीन लोणारे व संजय वाकडे बसले आहेत. (प्रतिनिधी)रिसोर्ट सचालकावर २७ जून २०१६ ला २ लाख १० हजार ७०० रुपयाचा दंड आकारुन वसूल करण्यात आला आहे. कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी वरिष्ठांकडे शिफारस केली आहे. ले-आऊट बाबत उपविभाीय अधिकारी यांच्याशी चर्चा करुन कारवाई करण्यात येईल. तथा बोगस बीपीएलधारकांचे नावे दिल्यास त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. यासह आणखीही मागण्याबाबतचे पत्र आपण उपोषणकर्तास दिले आहे.- संतोष महल्ले, तहसीलदार, चिमूर