शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ प्रत्येक ग्रामपंचायत निवडणुकीवर टाकतात बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 11:55 IST

Chandrapur News नागभीड तालुक्यात कोसंबी गवळीला लागून असलेल्या कोसंबी चक नावाचे एक गाव आहे. तेथील मतदार प्रत्येक ग्रा.पं.निवडणुकीवर बहिष्कार टाकतात. बहिष्काराचा हा क्रम त्यांनी यावेळीही कायम ठेवला.

 लोकमत न्यूज नेटवर्क  

चंद्रपूर: नागभीड तालुक्यात कोसंबी गवळीला लागून असलेल्या कोसंबी चक नावाचे एक गाव आहे. तेथील मतदार प्रत्येक ग्रा.पं.निवडणुकीवर बहिष्कार टाकतात. बहिष्काराचा हा क्रम त्यांनी यावेळीही कायम ठेवला.

             त्याचे होते असे की, कोसंबी गवळी आणि कोसंबीचक ही दोन्ही गावे एकच असली, तरी कागदोपत्री मात्र वेगवेगळी आहेत. या गावाच्या मध्ये फक्त एक रस्ता आहे. मात्र, कोसंबीचक या गावाला नेहमीच ग्रा.पं.निवडणुकीच्या वेळी सहा किमी अंतरावरील पारडी या ग्रामपंचायतीत समाविष्ट करण्यात येते.

             या गावातील जवळपास १२० मतदारांची सहा किमी अंतरावर असलेल्या पारडी ठवरे या ग्रामपंचायतींच्या मतदार यादीत नेहमीच नोंद होते. उल्लेखनीय, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी हेच मतदार गावातच म्हणजे कोसंबी गवळी येथे मतदान करतात. नेमक्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी या मतदारांची पारडी ठवरे या ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत नोंद होते. १५ ते २० वर्षांपासून असे सुरू असल्याची माहिती आहे.

             ग्रा.पं.निवडणुकीच्या वेळीही आमची नावे इतर निवडणुकीसारखीच कोसंबी गवळी ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत आली पाहिजेत, ही कोसंबीचकवासीयांची मागणी असली, तरी या मागणीकडे प्रशासनाचा नेहमीच कानाडोळा होत आहे. एवढेच नाही, तर लक्ष वेधण्यासाठी पारडी ठवरे ग्रा.पं.च्या निवडणुकीवर यापूर्वी अनेकदा बहिष्कारही टाकला, पण त्यांना न्याय मिळाला नाही. न्याय न मिळाल्याने त्यांनी यावेळीही मतदानावर बहिष्कार टाकला.

मागील १५ वर्षांपासून त्यांचा प्रस्ताव प्रशासनाच्या लालफीतशाहीत अडकला आहे. मी स्वतः अनेकदा ही नावे कोसंबी गवळी ग्रा.पं.च्या यादीत समाविष्ट करण्यात यावी, म्हणून पाठपुरावा केला आहे, पण नेहमीच चालढकल करण्यात येत आहे. शेवटी वैतागून मतदार मतदानावर बहिष्कार टाकतात. या मतदारांनी यावेळी बहिष्कार टाकला.

- संजय गजपुरे, जि.प.सदस्य

टॅग्स :Electionनिवडणूक