शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने न्याय दिला असता तर न्यायालयात जाण्याची गरज नव्हती-पुगलिया

By admin | Updated: July 17, 2015 00:52 IST

चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी आपण आधीपासून लढत होतो.

चंद्रपूर : चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी आपण आधीपासून लढत होतो. यासाठी विद्यमान राज्य व केंद्र सरकारकडेही पाठपुरावा केला होता. या सरकारांनी या सामाजिक प्रश्नावरील मागणीला न्याय दिला असता, तर न्यायालयात जाण्याची गरज नव्हती, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केले. गुरूवारी सायंकाळी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे आणि त्यानंतर केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने काढलेल्या आदेशाचे स्वागत केले. ते म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयाने आम्ही समाधानी झालो आहोत. चंद्रपुरात होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयामुळे आता हे शहर एज्युकेशन हब बनणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने ८ जुलैला दिलेल्या आदेशात आठवडाभरात हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे आणि शंभर विद्यार्थ्यांच्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात एमसीआयने सर्वोच्च न्यायालयात अपील केली होती. १५ जुलैला सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपिठासमोर उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात स्टे मागण्याचाही प्रयत्न झाला होता. मात्र उच्च न्यायालयाच्या मुदतीचा हा शेवटचा दिवस असल्याने एमसीआयने पूर्ण प्रयत्न केले. मात्र ते निष्फळ ठरले. १६ जुलैला हे प्रकरण या खंडापिठासमोर पुन्हा सुनावणीला आल्यावर न्यायालयाने स्थगनादेशाला नकार दिला. मात्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच ना.नितीन गडकरी आणि चंद्रपुरातील दोन्ही मंत्र्यांनी या महाविद्यालयासाठी पाठपुरावा केला, असे सांगणे म्हणजे जनतेची दिशाभूल आहे, असे म्हणाले.(जिल्हा प्रतिनिधी)