वर्तमानपत्रांनी आपली विश्वासार्हता जपली आहे. त्यामुळे आपण या माध्यमावर विश्वास ठेवू शकतो. जगात व आपल्या अवती -भोवती नेमके काय सुरू आहेे, हे आपल्याला वर्तमानपत्रातून कळते. त्यामुळे रोज वर्तमानपत्र वाचलेच पाहिजे. सध्या सर्वांना कोरोनाची भीती सतावत आहे. वर्तमानपत्र हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. लोकशाही जिवंत ठेवण्याचे मोलाचे काम वृत्तपत्र निर्भीडपणे करीत आहेत. वर्तमानपत्राद्वारे जनसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडली जाते. अनेक घटकांच्या मागण्या, प्रलंबित प्रश्न सरकार दरबारी मांडून ते साेडविण्याचे काम वर्तमानपत्र सक्षमपणे करीत आहेत. त्यामुळे प्रत्येकाला जशी शरीरस्वास्थ्यासाठी व्यायामाची गरज असते, तसेच बुध्दीला चालना मिळण्यासाठी वर्तमानपत्र वाचनाची आवश्यकता असते. लोकमत वृत्तपत्र संपूर्णत: सॅनिटाईज करून वितरीत केले जाते. बाजारात मिळणाऱ्या इतर वस्तुंप्रमाणे वृत्तपत्र आपल्या हातात पोहोचेपर्यंतची जी एक साखळी असते, त्या साखळीतही पूर्ण काळजी घेतली जाते. वृत्तपत्र हाताळल्याने कोरोनाचे संक्रमण होण्याचे प्रमाण नगण्य आहे. याऊलट कोरोनापासून स्वच्छता आणि समाजाचा बचाव कशा प्रकारे करता येईल, हेच वृत्तपत्रातून स्पष्टपणे सांगण्यात येते. कोरोनाच्या लसीसंदर्भात जगात काय सुरू आहे, हे वृत्तपत्रातून खात्रीशीर कळते, त्यामुळे समाजातील कोरोनाची भीती दूर होण्यास मदत होत आहे.
वृत्तपत्रातून कोरोनाचा धोका नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:28 IST