शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधी खर्चूनही सिंचनात वाढ नाही

By admin | Updated: July 13, 2015 01:06 IST

जिल्ह्यात मागील १५ वर्षांमध्ये विविध आर्थिक स्त्रोतातून ९०० पेक्षा अधिक कोल्हापुरी बंधारे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आले.

हिरवे स्वप्न भंगले : कोल्हापुरी बंधाऱ्याचे रूपांतर सिमेंट प्लगमध्ये करण्याची मागणीचंद्रपूर: जिल्ह्यात मागील १५ वर्षांमध्ये विविध आर्थिक स्त्रोतातून ९०० पेक्षा अधिक कोल्हापुरी बंधारे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आले. मात्र गावपातळीवरील नियोजनाच्या अभावामुळे हे बंधारे कोरडे असून त्यामुळे शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न भंगले आहे.जिल्हा परिषद सिंचन विभाग, लघु पाटबंधारे विभाग, जलसंधारण विभागाच्या माध्यमातून नक्षलग्रस्त निधी, राष्ट्रीय सम विकास आदिवासी उपयोजना, जलस्वराज, दुष्काळ निधी, विदर्भ पॅकेज, स्थानिक विकास निधी, खनिज विकास निधी, जिल्हा वार्षीक नियोजन अशा विविध स्त्रोतातून हे बंधारे बांधण्यात आलेत. एका बंधाऱ्यावर ५ लाख रुपयांपासून ६० लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यात आला. एका बंधाऱ्यामागे ५० हेक्टर ते २५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल, अशी अपेक्षा होती. मात्र जिल्हाभरातील कोल्हापुरी बंधारे आता शोभेची वास्तू ठरली आहे. गावपातळीवरील पाणी वाटप संस्था कागदावरच आहेत. या विषयात नियोजन नसल्याने बंधाऱ्यात पाणीच नसल्याचे चित्र सर्वदूर दिसून येते. बांधकामानंतर प्लेट गावपातळीवर पोहचत नाही. एकदा बंधाऱ्याचे बांधकाम झाले की, त्यानंतर बंधाऱ्यात पाणी अडले की नाही, हे पाहण्याचे साधे सौजन्यही कुणी दाखवत नाही. शासनाकडून दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. मात्र जलसंधारणच्या जन्माची व्यथा ‘पुढचे पाठ मागे सपाट’ अशीच झाली आहे. अनेक तालुक्यांमध्ये बंधारे बांधले खरे, पण त्यात पाणीसाठी होत नाही. खरे तर या उपक्रमातून जिल्ह्यात २५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येवून शेतकऱ्याच्या उत्पादनात वाढ व्हायला पाहिजे. परंतु चित्र उलटे आहे. भूगर्भात पाण्याची पातळी वाढली नाही. पाणी अडविल्या जात नाही. असे असले तरी दरवर्षी नविन बंधाऱ्यांची निर्मिती केली जात आहे. कोरपना तालुक्यातील कुकुळबोडी, कातलबोडी, बोरगाव येथे १ कोटी ५० लाख रुपये खर्च करून २०१३-१४ मध्ये बंधाऱ्याचे काम हाती घेतले. परंतु अद्यापर्यंत प्लेटांचा पुरवठा झाला नाही. कोरपना, जिवती, राजुरा तालुक्यात शेकडो बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले. मात्र ९० टक्के प्लेट चोरील्या गेल्या. बांधकाम होऊनसुद्धा पाणी अडविले नाही. याबाबत कॉंग्रेसचे आबिद अली यांनी कोल्हापुरी बंधाऱ्यांचे वास्तव पुढे ठेवून आमसभेत ठराव पारित करण्याचा आग्रह धरला. नवीन कोल्हापुरी बंधारे बांधकाम तालुक्यात करूच नये, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यानंतर नविन बांधकाम होणार नाही, असा ठराव पारिीा झाला.देवघाट नाल्यावर माथा ते पायथ्यापर्यंत सात कोल्हापुरी बंधारे उभे आहेत. या कामासाठी अडीच कोटींचा खर्च झाला. मात्र या बंधाऱ्यात पाण्याचा एक थेंबही नाही. उन्हाळ्यात नाल्याच्या काठावरील गावात पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. मात्र पिपर्डा या गावात लोकसहभागातून २ लाख ४६ हजार रुपये खर्चातून सिमेंट प्लग बंधाऱ्याची निर्मिती केली. गावकऱ्यांनी योग्य नियोजन केल्याने पिपर्डा हे गाव ‘पाणीदार’ म्हणून पुढे आले. या गावातील कोल्हापुरी बंधाऱ्यावर दगडी भिंत घालून बंधाऱ्यात पाणी साठविले. परिसरातील विहीरीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. १५० हेक्टर शेतात शेतकरी सिंचनाचा लाभ घेत आहे. जिल्हाभरातील कोल्हापुरी बंधारे दुरूस्ती, २ मीटर बाय १ मीटर दगडी बांध, गेट बंद करणे व गेट खोलीकरण कार्यक्रम शासनाने राबवावा. जलयुक्त शिवार कार्यक्रमात बंधाऱ्यांचा समावेश करून धडक कार्यक्रम राबविल्यास जिल्ह्यातील ३०० पेक्षा अधिक गावांना त्याचा लाभ होईल. यासाठी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आबीद अली यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांना भेटून कोल्हापुरी बंधाऱ्याचे सिमेंट प्लगमध्ये रूपांतर करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)