शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शिस्तीसोबत तडजोड नाही

By admin | Updated: July 15, 2015 01:08 IST

पोलीस खाते हे शिस्तीचे खाते आहे. या खात्यात उच्च शिस्त असावी. त्यात तडजोड खपवून घेतली जाणार नाही.

संदीप दिवाण : मीट द प्रेसमध्ये व्यक्त केल्या भावनाचंद्रपूर : पोलीस खाते हे शिस्तीचे खाते आहे. या खात्यात उच्च शिस्त असावी. त्यात तडजोड खपवून घेतली जाणार नाही. शिस्त मोडणाऱ्यांवर कडक कायवाई केली जाईलच, असे स्पष्ट प्रतिपादन नवे जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण यांनी मंगळवारी केले.चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांची मीट द पे्रस पार पडली. त्यावेळीे ते बोलत होते. ते म्हणाले, सध्या पोलिसांवर प्रचंड ताण आहे, हे आपणाही अनुभवतो. मात्र शिस्त मोडून चालणार नाही. गडचांदुरातील एका मद्यपी पोलीस कर्मचाऱ्यावर शिस्तभंग प्रकरणी केलेली कारवाई सांगून ते म्हणाले, कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी व्हावा यासाठी आपण वेगवेगळे प्रयोगही करीत आहेत. १६५ बिटातील कर्मचाऱ्यांसाठी हॅपीनेस प्रोग्राम आयोजित केले आहेत. १०५ बिटात कार्यक्रम झालेत. सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून घेणार आहे. फिटनेसवर भर दिला जाणार आहे.गुन्हे नियंत्रण हे पोलीस खात्याचे आद्य कर्तव्य आहे. गुन्हे उघडकीस आणणे, त्याचा तपास योग्यपणे करणे आणि सक्षम पुराव्यासह प्रकरण न्यायालयात नेणे हे पोलिसांचे तीन मुख्य कर्तव्य आहेत. नागरिक आणि पोलीस यात सुसंवाद राहावा यासाठी प्रत्येक दखलपात्र गुन्ह्यात हवालदाराने भेट देणे आपण बंधनकारक केले आहे. ठाण्यात येणाऱ्या सर्व अर्जांची चौकशी व्हायलाच हवी, अशा सूचना दिल्या आहेत. ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळावी, किमान येणाऱ्यांना ग्लासभर पाणी आधी मिळावे, याकडे आपला कल आहे. पोलीस अधिकारी, बिट अधिकाऱ्यांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला असून त्या माध्यमातून आपण यंत्रणेच्या कामाचा आढावा घेत असतो, असेही ते म्हणाले. अलीकडे शिक्षेचे प्रमाण कमी झाल्याने गुन्हेगारांना भीती वाटत नाही. मात्र अधिकाऱ्यांनी नि:पक्षपणे काम करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. दारूबंदीमुळे कामाचा ताण वाढल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात मान्य करून ते म्हणाले, गुन्हेगारांना कडक शासन व्हायला हवे. दारू आणणाऱ्यांसोबतच ती ठोकपणे विकणाऱ्यांवरही कारवाया आम्ही सुरु केल्या आहेत. दारूबंदीची २ हजार ४०० प्रकरणे आणि साडेतीन कोटी रूपयांची दारू जप्त केली.