शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बाबुपेठात विकासकामांचा पत्ताच नाही

By admin | Updated: January 22, 2015 00:54 IST

चंद्रपूर महानगरपालिका आपल्या सीमेचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी आजुबाजुच्या ग्रामपंचायतींना जोडण्याचा प्रस्तावही मनपाने तयार केला आहे.

रवी जवळे चंद्रपूर चंद्रपूर महानगरपालिका आपल्या सीमेचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी आजुबाजुच्या ग्रामपंचायतींना जोडण्याचा प्रस्तावही मनपाने तयार केला आहे. दुसरीकडे ज्या वस्त्या मनपा हद्दीत आहे, त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. तेथील समस्यांचा निपटाराच अद्याप महानगरपालिकेला करता आला नाही. बाबुपेठ प्रभागात तर विकासकामांचा पत्ताच नसल्याचे दिसून आले. एकदोन रस्त्यांचे अपवाद वगळले तर संपूर्ण प्रभागातच रस्त्यांची कामे प्रलंबित आहे.चंद्रपूर शहराच्या एका बाजुला असलेल्या बाबुपेठ परिसराकडे महानगरपालिकेचे अद्याप लक्षच गेले नसल्याचे दिसून येते. महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर विविध करांमध्ये वाढ करण्यात आली. एलबीटीसह विविध योजनांचा निधीही मनपाला प्राप्त होत आहे. असे असले तरी बाबुपेठ प्रभागाच्या विकासासाठी मनपा निधी देण्यात कुचराई तर करीत नाही ना, असा प्रश्न या प्रभागात फिरल्यानंतर उपस्थित होतो. लोकमत चमूने आज बुधवारी बाबुपेठ प्रभागात फेरफटका मारला असता अनेक समस्या दिसून आल्या. नागरिकांनीही पोटतिडकीने लोकमतजवळ आपल्या समस्या मांडल्या. बाबुपेठ प्रभाग शहरातील फार जुनी वस्ती आहे. अनेक वर्षांपूर्वी या वस्तीकडे पालिका प्रशासनाने फारसे लक्ष घातले नाही. त्यामुळे या वस्तीचा फारसा विकास तेव्हा झालेलाच नव्हता. त्यानंतर मधल्या काळात या परिसरात आणखी नागरी वस्ती वाढू लागली. तेव्हा नागरिकांची ओरड बघता या ठिकाणी रस्ते, नाली, पिण्याचे पाणी या सोई उपलब्ध करून देण्यात आल्या. आता पुन्हा या परिसराकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. शहरात सध्या रस्ते व नाल्यांची कामे जोमात सुरू आहे. मात्र बाबुपेठ प्रभागात चारदोन रस्त्यांचा अपवाद सोडला तर इतर सर्व रस्ते उखडलेले आहेत. यापूर्वी ज्या रस्त्यांचे डांबरीकरण झाले, त्या रस्त्यावर सध्या डांबराचा लवलेशही दिसत नाही. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. चंद्रशेखर आझाद चौक परिसरातील रस्त्यांची तर दैना झालेली दिसून आली. या चौकाच्या चारही बाजुचे रस्ते उखडलेले आहेत. चंद्रशेखर आझाद चौकाच्या फलकापासून थोडे पुढे गेल्यावर सिमेंट रस्ता दिसतो. अलिकडेच हा रस्ता बांधला असावा. मात्र या रस्त्यावरही आता सिमेंट उखडून खड्डे पडले आहेत. नागरिकांनी याबाबत अनेकदा येथील नगरसेवक हनुमान चौखे यांना सांगितले. मात्र त्यांनी याकडे लक्षच दिले नाही, असा नागरिकांचा आरोप आहे. फुले चौक परिसरातही रस्त्यांची अशीच अवस्था आहे. विशेष म्हणजे, फुले चौक परिसरातील पथदिवे बंद असल्याचे नागरिकांचे सांगितले. त्यामुळे रात्री या ठिकाणी अंधाराचे साम्राज्य पसरले असते. बाबुपेठ प्रभागात नाल्यांची समस्याही रस्त्यांएवढीच भिषण आहे. सुमारे ३० वर्षांपूर्वी या ठिकाणी नाल्या बांधल्या आहेत. सद्यस्थितीत प्रभागातील बहुतांश नाल्या तुटलेल्या आहेत. नाल्यांचा रस्त्यांकडील काठ खचल्याने नाल्यातील सांडपाणी रस्त्यावर येते. काही ठिकाणी पालिकेने अतिशय लहान आणि निमुळत्या नाल्या बांधल्या आहेत. या नाल्यांना स्लोपही नाही. त्यामुळे सांडपाणी वाहत नाही. नाल्या लहान असल्याने प्लॅस्टिकसारखा कचरा नालीत गेला की नाली चौकअप होते. मनपाचे सफाई कर्मचारी तीनचार महिन्यातून एकदा येत असल्याने हा कचरा नालीत तसाच कायम असतो, असेही नागरिकांनी सांगितले. त्यामुळे दुर्गंधी पसरून डासांचा प्रादुर्भाव होत आहे. कचराकुंड्या कमी असल्याने रस्त्यावरच कचरा पडलेला असतो.