शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ राज्य जनतेचीच मागणी आहे

By admin | Updated: April 23, 2016 00:52 IST

विदर्भ राज्य निर्माण व्हावे, अशी फक्त काहीची मागणी आहे. जनतेची मागणी नाही, असा गैरसमज पश्चिम महाराष्ट्रातील नेते सर्वदूर पसरवित आहेत.

श्रीहरी अणे : ब्रह्मपुरीत ‘मी विदर्भ बोलतोय’ सभेला उत्स्फूर्त प्रतिसादब्रह्मपुरी : विदर्भ राज्य निर्माण व्हावे, अशी फक्त काहीची मागणी आहे. जनतेची मागणी नाही, असा गैरसमज पश्चिम महाराष्ट्रातील नेते सर्वदूर पसरवित आहेत. पण तो गैरसमज दूर करुन विदर्भ राज्य निर्माण व्हावे, ही जनतेचीच मागणी आहे, हे विरोध करणाऱ्यांनी समजून घ्यावे, अशी स्पष्टोक्ती अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केली.ब्रह्मपुरी येथे पार पडलेल्या ‘मी विदर्भ बोलतोय’ सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भवीर जांबुवंतराव धोटे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. वामनराव चटप, अ‍ॅड. अनिल किलोर, नितीन रोंगे, अ‍ॅड. मुकेश समर्थ, किशोरसिंह बैस, अ‍ॅड. नंदा पराते, सतीश इटकेलवार, प्रमोद बनकर, अ‍ॅड. विजय खांदेवाले, बंडू धोतरे, अशोक रामटेके, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, सुधील सेलोकर, सुखदेव प्रधान आदी विदर्भलढ्याच्या विचारपीठावर उपस्थित होते.अ‍ॅड. श्रीहरी अणे पुढे म्हणाले, विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी मुंबई व पश्चिम महाराष्ट्रातील नेते अनेक गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी होत असलेला गैरसमज समजावून सांगणे महत्त्वाचे आहे. दिल्ली येथे पार पडलेल्या जंतरमंतर सभेत विदर्भातून तीन हजार महिला उपस्थित होत्या. यापूर्वी जनमंचने मतदान घेतले असता विदर्भातील जनतेने ९० टक्के मतदान विदर्भाच्या बाजूने केले आहे. मग ही मागणी जनतेची कशी नाही, याचा विचार विरोधकांनी केला पाहिजे. विदर्भ राज्य होणे हा भाषिक वाद नाही. विदर्भात जंगल, जमीन, वीज, पाणी, खनिज संपत्ती विपूल प्रमाणात आहे. आपल्या खांद्यावर भार देऊन प. महाराष्ट्र व मुंबई मजा मारीत आहे. नोकऱ्या, सिंचन, निधी हे सर्व प. महाराष्ट्राने पळविले आहे. विदर्भ आर्थिकदृष्टया संपन्न आहे. शेतकऱ्यांविषयी बोलताना म्हणाले की, आपल्या राज्यात शेतकऱ्यांच्या समस्यांना प्राधान्य देण्यात येईल व आत्महत्या होणार नाही. यासाठी उपाययोजना केल्या जातील, असे सांगितले. तर अ‍ॅड. अनिल किल्लोर, अ‍ॅड. वामनराव चटप, अ‍ॅड. नंदा पराते, किशोरसिंह बैस, अशोक रामटेके आदींनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, परिचय सुधीर सेलोकर, संचालन प्रा. डॉ. युवराज मेश्राम तर आभार प्रधान यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)