शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निर्माल्य संकलनासाठी ठेवलेल्या टँंकची चोरी

By admin | Updated: September 3, 2014 23:16 IST

गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात निर्माल्य भाविक नदी, तलावामध्ये टाकतात. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. सदर प्रदूषण टाळता यावे यासाठी निर्माल्य संकलनासाठी महानगरप्रशासन

चंद्रपूर : गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात निर्माल्य भाविक नदी, तलावामध्ये टाकतात. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. सदर प्रदूषण टाळता यावे यासाठी निर्माल्य संकलनासाठी महानगरप्रशासन तयारीला लागले आहे. यासाठी झोननुसार प्लॉस्टीक ड्रमही खरेदी करण्यात आले आहे. रामाळा तलावाशेजारी निर्माल्यासाठी ठेवण्यात आलेली टाकी चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार मंगळवारी रात्रीच्या सुमारात घडला. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.चंद्रपूरची ओळख प्रदूषित शहर अशी होत आहे. ही ओळख पुसून काढण्यासाठी तसेच आरोग्यासाठी प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविणे गरजेचे आहे. यासाठी नागरिकांनी आणि प्रशासनाचा पुढाकारही तेवढाच महत्त्वाचा आहे. चंद्रपुरात गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. हे टाळण्यासाठी महानगरपालिकेने काही प्रमाणात का होईना प्रयत्न सुरु केले आहे. नगरसेवक संजय वैद्य यांनी इरईनदीच्या पात्रामध्ये गणेश विसर्जन तसेच निर्माल्यदानासाठी पात्र खोल करण्याची सातत्याने मागणी धरून लावली. या मागणीनंतर महानगरपालिकेने इरईचे पात्र खोल करण्याची मोहीम आरंभली आहे. येथील इरई नदीच्या पात्राची स्वच्छता करून तेथे गणेश विसर्जनासाठी पात्र तयार केले आहे. सोबतच निर्माल्य टाकण्याची व्यवस्थाही केली आहे. मागील तीन दिवसांपासून जेसीबीच्या माध्यमातून पात्र खाल करण्याचे काम सुरु आहे. सदर कामावर आयुक्तांसह, नगरसेवक संजय वैद्य, पर्यावरण प्रेमी संस्था, जलबिलादरीसंस्थेचे कार्यकर्ते लक्ष ठेवून आहे. विशेष म्हणजे, बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी नदीपात्राची पाहणी केली. या पाहणीत त्यांनी आणखी काही उपाययोजना सुचविल्या आहे.निर्माल्यजमा करून ते पुरल्या जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात निर्माल्य न टाकता ड्रममध्ये टाकावे, अशी विनंती करण्यात आली आहे. मात्र आजही अनेक भाविक निर्माल्य ड्रममध्ये न टाकता ते नदीपात्रात टाकत असल्याने प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच काही चोरट्यांची नजर या ड्रमवर गेली आहे.रामाळा तलावाशेजारी ठेवलेली टँक चोरट्यांनी पळवून नेली. त्यामुळे मनपा प्रशासनही हतबल झाले आहे.आता मनपा वेगळी व्यवस्था करणार आहे. (नगर प्रतिनिधी)