शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

संगणक चोरट्यांच्या टोळीला अटक

By admin | Updated: September 22, 2014 23:17 IST

पोंभुर्णा तालुक्यातील घाटकूळ येथील महात्मा फुले विद्यालयातून संगणक साहित्य लांबविणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या अटकेने संगणक चोरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

चंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यातील घाटकूळ येथील महात्मा फुले विद्यालयातून संगणक साहित्य लांबविणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या अटकेने संगणक चोरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे यावर काही प्रमाणात आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.प्रफुल्ल रघुनाथ दुर्गे (२९), स्वप्नील आनंद अवधरे (२२), एक अल्पवयीन मुलगा (रा. मुधोली, चक ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) यांच्यासह बंटी ऊर्फ अनुराग नामदेव गजघाटे (२४ ) रा. इंदिरानगर चंद्रपूर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. रघुनाथ दुर्गे, स्वप्नील अवधरे यांच्यासह एकाने १६ सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास घाटकूळ येथील महात्मा फुले विद्यालयातील संगणक साहित्य लंपास केले. चोरी केलेल्या साहित्याची किंमत १ लाख ९ हजार ३५० रुपये आहे. १७ सप्टेंबरला मुख्याध्यापक प्रफुल्ल भसारकर यांनी पोलिसांत याची तक्रार केली. ठाणेदार दिलीप डोलारे यांनी तपास सुरु केला. तपासादरम्यान संशयास्पद फिरत असलेल्या प्रफुल्ल दुर्गे, स्वप्नील अवधरे यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता तिघांनाही दहावीत प्रवेश घेण्याचे सांगून घाटकूळ येथील महात्मा फुले शाळेत दाखल झाले.यातील एकाने कार्यालयात, तर दोघांनी शाळेतील खोल्यांची व परिसराची पहाणी करीत होते. शाळेची संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी संगणक आणि अन्य साहित्य चोरुन नेले. ते साहित्य त्यांनी चंद्रपुरातील बंटी ऊर्फ अनुराग नामदेव गजघाटे याला विकल्याचे सांगितले. पुढील तपास पोलीस करीत आहे. (नगर प्रतिनिधी)