शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

पहाडावरील दुर्लक्षित कुळसंगेगुड्याचा अंधार आता होणार कायमचा दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 05:00 IST

कुळसंगेगुडा येथे २१ आदिवासी कुटुंो वास्तव्याला आहेत. मागील पाच वर्षांपासून गावात विद्युत पुरवठा व्हावा म्हणून गावकऱ्यांच्यावतीने अनेकदा निवेदने देण्यात आली. परंतु, त्याची कोणाकडूनही दखल घेण्यात आली नाही. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास राठोड यांनी कुळसंगेगुडा येथील जनतेच्या समस्या जाणून घेऊन काम मंजूर होईपर्यंत त्याचा सतत पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले. त्यांच्या प्रयत्नाने कुळसंगेगुडा गाव कायमचा अंधारमुक्त होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : तालुक्यापासून आठ किलोमीटर दूर वसलेल्या कुळसंगेगुडा येथे नवीन विद्युत जोडणीचे १७ लाख ४८ हजार ८६८ रुपये किमतीचे काम सुरू झाले आहे. यामुळे मागील पाच वर्षे दिव्याच्या साहाय्याने रात्र काढलेल्या कुळसंगेगुडावासीयांच्या नशिबी आलेला अंधार कायमचा दूर होणार आहे.प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर या यंत्रणेच्या देखरेखीत विद्युत विकास या उपशीर्षांतर्गत कुळसंगेगुडा गावात नवीन विद्युत जोडणीसाठी तांत्रिक मान्यता मिळाली असून, प्रशासकीय किंमत १७ लाख ४८ हजार ८६८ रुपयांचे काम जिल्हाधिकारी यांच्या प्रशासकीय मान्यता व निधी वितरण आदेशानुसार मंजूर आहे. यासाठी कैलास राठोड यांनी सतत पाठपुरावा केला होता, हे विशेष.कुळसंगेगुडा येथे २१ आदिवासी कुटुंो वास्तव्याला आहेत. मागील पाच वर्षांपासून गावात विद्युत पुरवठा व्हावा म्हणून गावकऱ्यांच्यावतीने अनेकदा निवेदने देण्यात आली. परंतु, त्याची कोणाकडूनही दखल घेण्यात आली नाही. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास राठोड यांनी कुळसंगेगुडा येथील जनतेच्या समस्या जाणून घेऊन काम मंजूर होईपर्यंत त्याचा सतत पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले. त्यांच्या प्रयत्नाने कुळसंगेगुडा गाव कायमचा अंधारमुक्त होणार आहे.

आदिवासी घटक योजनेतून मिळाला निधीकुळसंगेगुड्यातील विद्युतीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या आदिवासी घटक योजनेमधून १७ लाख ४८ हजार ८६८ रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर झाले असून, आदिवासी बांधवांच्या घरात प्रकाश पोहोचविण्याचे काम महावितरणद्वारा सुरू करण्यात आले आहे.

मागील पाच वर्षांपासून आम्ही वारंवार विद्युत जोडणीसाठी अर्ज, निवेदने दिली. परंतु, कोणीही दखल घेतली नाही. गावात वीज नसल्याने २१ कुटुंबांनी खायच्या तेलाचे दिवे लावून एवढ्या रात्री काढल्या. कैलास राठोड यांच्यामुळे आमच्या गावात वीज येणार आहे.- अंबाजी लिंगू कोटनाके, गाव पाटील, कुळसंगेगुडा.

 

टॅग्स :electricityवीज