शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

गैरव्यवहारातील ‘त्या’ अधिकाऱ्यांची मुंबईत नोंदविण्यात येणार साक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 05:00 IST

 महाराष्ट्र विधानमंडळ गठित २९ आमदारांच्या पंचायत राज समितीचे मंगळवारी सकाळी शासकीय विश्रामगृहात आगमन झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी अपुऱ्या निधीचा मुद्दा मांडला. यावेळी समितीचे प्रमुख आमदार संजय रायमुलकर व   सदस्य उपस्थित होते. जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विविध विकासात्मक अडचणी समितीसमोर मांडल्या. यामध्ये जिल्ह्याच्या दुर्गम भागातील अनेक ग्रामपंचायती तेलंगणा राज्यात गेल्या आहेत.

ठळक मुद्देपंचायत राज समिती दाखल : समितीकडे गंभीर स्वरूपाच्या तक्रारी

 लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अपुऱ्या निधीमुळे विकास कामे मार्गी लावताना अडचणी येतात. विकास कामांना ब्रेक लागतो. त्यामुळे याकडे लक्ष घालून सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्याला भरघोस निधी मिळावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा, असे गाऱ्हाणे जि. प. पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पंचायत राज समितीकडे मांडले.  या समितीने पहिल्या दिवशी सहा वर्षांतील लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवाल परिच्छेदांची तपासणी करून प्रश्नावलीचा आढावा घेतला.   बांधकाम विभागाचे तत्कालीन  तीन कार्यकारी अभियंता व तत्कालीन जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी समाधान उत्तर दिले नाही. त्यामुळे     त्यांची  मुंबईत पुन्हा साक्ष होणार  आहे. समितीकडे काही गंभीर स्वरूपाच्या तक्रारीही प्राप्त झाल्याचे समजते. महाराष्ट्र विधानमंडळ गठित २९ आमदारांच्या पंचायत राज समितीचे मंगळवारी सकाळी शासकीय विश्रामगृहात आगमन झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी अपुऱ्या निधीचा मुद्दा मांडला. यावेळी समितीचे प्रमुख आमदार संजय रायमुलकर व   सदस्य उपस्थित होते. जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विविध विकासात्मक अडचणी समितीसमोर मांडल्या. यामध्ये जिल्ह्याच्या दुर्गम भागातील अनेक ग्रामपंचायती तेलंगणा राज्यात गेल्या आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील विकासाठी अडचणी येतात, जिल्हा परिषदेतील अनेक पदे रिक्त आहेत. परिणामी, कामकाजात समन्वय साधणे अडचणीचे ठरत आहे, कोविड १९ महामारीच्या काळात जिल्हा परिषद आरोग्य प्रशासनाने चांगली कामगिरी केली. मात्र, कर्तव्य बजावताना मनुष्यबळासह नवीन तांत्रिकीकरणाची अनेक गरजा लक्षात आल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अत्याधुनिकीकरण किती गरजेचे आहे, हेही समजल्याचे जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी समितीसमोर चर्चेदरम्यान नमुद केले. पशुसंवर्धन विभागाला निधीअभावी आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे लम्पी सारख्या आजाराचा सामना करावा लागला. जिल्ह्यातील शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी उत्तम वर्गखोल्या, संगणकीकरण व विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी जि. प. कटिबद्ध आहे. परंतु अपुऱ्या निधीमुळे कामे मार्गी लावताना अडचणी निर्माण येतात. त्यामुळे समितीने याकडे लक्ष घालावे आणि सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्याला जादा निधी देण्याची मागणी जि. प. पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी अर्थ व बांधकाम सभापती राजू गायकवाड, समाजकल्याण सभापती नागराज गेडाम, कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे, महिला व बालकल्याण सभापती रोशनी खान, जि. प. सदस्य संजय गजपूरे, खोजराम मरस्कोल्हे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले आदी उपस्थित होते. 

तत्कालीन अधिकाऱ्यांची 'पीआरसी' समोर हजेरीचंद्रपूर जि. प. मध्ये कार्यरत तत्कालीन अधिकाऱ्यांनी पंचायत राज समितीसमोर  पहिल्या दिवशी तातडीने दाखल झाले. सहा वर्षांतील लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवाल परिच्छेदांची तपासणी करून प्रश्नावलीसंदर्भात आढावा घेण्यात आला. चंद्रपुरातून बदलून राज्यभरात गेलेल्या अधिकाऱ्यांनी 'पीआरसी' समोर हजेरी लावली होती. दरम्यान, समितीकडे काही गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या. बांधकाम विभागाचे तत्कालीन तीन कार्यकारी अभियंता व जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली. या अधिकाऱ्यांची लवकरच मुंबईत पुन्हा साक्ष होणार असल्याचे समजते.

आज आरोग्य केंद्र, शाळा, पंचायत समित्यांना भेटी देणारचंद्रपुरातील शासकीय विश्रामगृहात पंचायत राज समिती दाखल झाल्यानंतर जिल्ह्यातील आमदारांशी अनौपचारिक चर्चा करण्याचे नियोजन ठरले होते. ही चर्चा आटोपल्यानंतर जि. प. सदस्यांशी समितीने संवाद साधला. त्यानंतर २०१०-२०११ ते २०१६-१७ च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवालातील परिच्छेदसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांची साक्ष नोंदविण्यात आली. बुधवारी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, ग्रामपंचायती व पंचायत समित्यांना भेट देण्याबाबतही नियोजन केल्याचे समजते.

दोषींवर कारवाईचा बडगापंचायत राज समितीकडून पहिल्या दिवशी जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हा परिषदेला मिळालेल्या निधीचे विनियोजन कशा पद्धतीने होते, याचा आढावा घेण्यात आला. लेखा आक्षेपावरून काही अधिकाऱ्यांना समितीने धारेवर धरले. चौकशीत दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

२९ पैकी १६ सदस्य  जिल्हास्थळी दाखलपंचायतराज समितीत पहिल्या दिवशी १६ सदस्य सहभागी झाले. बुधवारी आणखी काही सदस्य येणार आहेत. समितीकडून चार पथक तयार करून जिल्हाभरात दौरा केला जाणार आहे.

 

टॅग्स :fraudधोकेबाजी