शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बकूळ धवने तेजस्विनी सन्मानाची मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 23:04 IST

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भारतीय स्त्री शक्ती चंद्रपूरतर्फे दरवर्षी दिला जाणारा सुरूचि पोफळी स्मृती तेजस्विनी सन्मान यंदा चंद्रपुरातील उदयोन्मुख नाट्य अभिनेत्री बकूळ अजय धवने हिला प्रदान करण्यात येणार आहे. १० मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता चंद्रपुरातील तुकूम परिसरातील न्यु इंडिया कॉन्व्हेंट येथे हा तेजस्विनी सन्मान सोहळा होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भारतीय स्त्री शक्ती चंद्रपूरतर्फे दरवर्षी दिला जाणारा सुरूचि पोफळी स्मृती तेजस्विनी सन्मान यंदा चंद्रपुरातील उदयोन्मुख नाट्य अभिनेत्री बकूळ अजय धवने हिला प्रदान करण्यात येणार आहे. १० मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता चंद्रपुरातील तुकूम परिसरातील न्यु इंडिया कॉन्व्हेंट येथे हा तेजस्विनी सन्मान सोहळा होणार आहे.या समारंभाला अ‍ॅड. वर्षा जामदार यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून अध्यक्षस्थानी डॉ. शरदचंद्र सालफळे हे राहतील. यावर्षीची तेजस्विनी सन्मानाची मानकरी बकूळ धवने हिने अल्पवयात नाट्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा सन्मान तिला प्रदान करण्यात येणार आहे.राज्य बालनाट्य स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा, कामगार नाटय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट अभिनयाची पारितोषिके तिने पटकाविली असून तिने अभिनित केलेली सर्वच नाटके स्पर्धांमध्ये अव्वल ठरली आहे. थेंबांचे टपाल, अनवाणी, भट्टी, तो एक उंबरठा, मन मनास उमगत नाही, चिंधी बाजार, ईदी, रंगबावरी, नथिंग टू से या नाटकांमधून तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहे. कामगार राज्य नाटय स्पर्धेच्या नागपूर विभागीय प्राथमिक फेरीत सलग तीन वर्षे तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा प्रथम पुरस्कार प्राप्त करत हॅट्ट्रीक साधली.