शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

शिक्षणाच्या माहेरघरात शिक्षक दारोदार

By admin | Updated: June 5, 2015 01:17 IST

नुकताच १२ वी व १० वीच्या सीबीएसईचा निकाल लागला. जिल्ह्यात १२ वीत प्रथम नेहा सिंग या विद्यार्थिनीने व १० वीत प्रथमेश दहीकर याने प्रथम येऊन

शिक्षकांच्या उन्हाळी सुट्या नावापुरत्या: कॉन्व्हेंटमध्ये प्रवेशासाठी प्रचंड गर्दीब्रह्मपुरी: नुकताच १२ वी व १० वीच्या सीबीएसईचा निकाल लागला. जिल्ह्यात १२ वीत प्रथम नेहा सिंग या विद्यार्थिनीने व १० वीत प्रथमेश दहीकर याने प्रथम येऊन ब्रह्मपुरी शिक्षणाचे माहेरघर आहे, हे सिद्ध करुन दाखविले आहे. परंतु दुसरीकडे शिक्षणाच्या माहेरघरातील शिक्षक प्रवेशासाठी दारोदार फिरत असल्याने विषमतेचे चित्र निर्माण झाले आहे.तालुक्यात १२ वीचा निकाल समाधानकारक आहे. परंतु तालुक्यातील बहुतांश शाळा व महाविद्यालयात प्रवेशासाठी अजूनही फिरावे लागत असल्याने शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्यांवर पाणी फिरल्या गेले आहे. महाविद्यालयातील प्रवेशासाठी असे चित्र पूर्वी दिसत नव्हते. अलिकडे प्राध्यापकांनाही फिरावे लागत असल्याने विद्यार्थ्यांचे भाव गगनाला भिडले आहे. शिक्षक दारोदारी जात असल्याने शिक्षकांप्रति विद्यार्थ्यांच्या मनात आदरभाव नसल्याचे अनेक शिक्षकांचे मत आहे. प्राचार्य उंटावरुन शेळ्या हाकण्यापलीकडे कुलरच्या बाहेर पडत नाही. परंतु शिक्षकांना प्रवेशासाठी बाहेर जाऊन फिरावेच लागेल, असा बडगा मानगुटीवर बसवला जात आहे. अनेक प्राचार्यांना शहरात किंवा गावखेड्यात पाहिले जात नाही.केवळ त्या शिक्षकाच्या भरवश्यावर प्रवेश आणले जात असल्याने प्राचार्यपद शोभेचे बनले असल्याचे शिक्षकांकडूनच आता बोलले जात आहे. शिक्षक दारोदार फिरुनही त्यालाच प्रवेशासाठी दोषी ठरविण्याचीही भूमिका वरिष्ठाकडून ठरवून अपमानीत करण्याचाही प्रयत्न केला जात असल्याने शिक्षणाच्या माहेरघरात शिक्षकांची व्यवस्था ‘आयाराम गयाराम’ प्रकाराची बनलेली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी बहुतांश पालक कॉन्व्हेंटच्या प्रचंड रांगेत उभा राहून प्रवेश घेण्यासाठी धडपत असतात. पण दारावर आलेल्या शिक्षकाला प्रतिसाद न देता आल्यापावली अपमानित केले जाते.अशी विषम स्थिती प्रवेशासाठी निर्माण झाली आहे. कॉन्व्हेंटच्या प्रवेश शुल्कावर कुठलेही निर्बंध नाही. मासिक फी दरवर्षी वाढविली जात आहे. तरीपण या लुटमार प्रकाराकडे श्क्षिणाधिकाऱ्यांचा कानाडोळा होत आहे. दरवर्षी प्रवेश फी पाच हजाराच्या वरुन घेतली जात असल्याने मध्यवर्गीयाचे शिक्षणनगरीत आर्थिक कंबरडे मोडत आहे. (तालुका प्रतिनिधी)‘ढ’ विद्यार्थ्यांवर गडांतरशाळेत १०० टक्के निकाल लावण्याची स्पर्धा लागली असून कुमकुवत मुलांना निकाल लावण्याच्या नादात काढण्याचे फर्मानही शाळांकडून काढले जात असल्याने शिक्षणाच्या माहेरघरात विद्यार्थ्यांची ही दशा घडून येत आहे. यावरही कोणाचेही निर्बंध नाही. शाळेत शिक्षकांकडून अनेक कामे करवून घेतली जात असते. परंतु पगार अल्प असल्याने शिक्षणाचा स्तर खालावला जात असतो. अनेक खाजगी शाळेत श्क्षिकांचे आर्थिक शोषणही होताना दिसून येत आहे. शहरात अनेक खाजगी वर्ग सुरु आहेत. तेथेही नियमित शिक्षक संगनमताने शिकवणी वर्ग सुरु ठेवून अमाप पैसा लाटत आहेत तर दुसरीकडे बेरोजगार अल्पशा पगारावर काम करीत असल्याने त्यांचे आर्थिक शोषण होताना दिसून येत आहे. शिक्षणाच्या माहेरघरात विद्यार्थ्यांच्या भरवश्यावर यश संपादन करुन शाळेचा नाव मोठा करण्यासाठी हा प्रकार सुरु झाला आहे. शिक्षण विभाग मात्र याकडे अजिबात दुर्लक्ष करीत आहे. शिक्षणात अग्रेसर असलेली नगरी पैशाच्या जोरावर समोर जात असली तरी शिक्षकाची स्थिती मात्र केविलवाणी आहे.