शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

अध्यापन करताना शिक्षकांना स्वातंत्र्य द्यायला हवे : वसंत पुरके

By admin | Updated: January 18, 2016 00:57 IST

शिक्षण ही निरंतन चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षणात हे विविध कलागुणांचा संगम असला पाहिजे. शिक्षकांना अध्यापन करताना स्वातंत्र्य द्यायला हवे,

वरोरा : शिक्षण ही निरंतन चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षणात हे विविध कलागुणांचा संगम असला पाहिजे. शिक्षकांना अध्यापन करताना स्वातंत्र्य द्यायला हवे, मात्र शिक्षकांनी समाजात जबाबदारपणे वागायला पाहिजे याकरिता शिक्षकांची गुणवत्ता वाढणे आवश्यक आहे. जे शिक्षक प्रामाणिकपणे शिकवितात त्यांचे कौतुक व्हायला पाहिजे, असे मत राज्याचे माजी शिक्षण मंत्री प्रा.वसंत पुरके यांनी केले. ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ व कर्मविर विद्यालय वरोराच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘सध्याच्या शिक्षणाची दशा व दिशा’ या विषयावर आयोजित परिसंवादामध्ये ते बोलत होते. यावेळी ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय देवतळे, लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ना.गो. थुटे, दिशा एज्युकेशन पार्इंटचे संचालक रूपेश घागी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. अध्यापन हे पवित्र कार्य आहे. खरा अध्यापक विद्यार्थ्यांमधील चांगल्या गुणांना सतत शोध घेत असतो व त्यांच्या विकासात चालना देतो, म्हणून तो समाजाला संजीवनी देवू शकतो आणि मुलांचे भविष्य घडवू शकतो. व्यक्तीच्या आचार विचारात होणारे बदल म्हणजे शिक्षण आणि व्यक्ती वर्तनातील चांगल्या गुणांचे शिक्षण म्हणजे सतपरिवर्तन. हे सतपरिवर्तन शिक्षणातून येते, असे मत प्रा.वसंत पुरके यांनी व्यक्त केले. शिक्षकांनी अध्यापनात नवीन तंत्राचा वापर करावा आणि वाचनावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी सेवानिवृत्त व गुणवंत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन, आभार शेंडे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)