शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
4
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
5
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
6
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
7
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
8
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
9
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
10
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
11
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
12
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
14
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
15
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
16
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
17
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
18
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
19
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
20
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
Daily Top 2Weekly Top 5

भामडेळी ग्रामपंचायतीची महावितरणवर कर आकारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 05:00 IST

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १२४ व कर व फी नियम ६६ भाग ब  अन्वये महावितरण कंपनीवर पुढीलप्रमाणे  कर आकारणी करण्यात आली. इलेक्ट्रीक पोल ४६ नग,  प्रती नग एक हजार रुपये असे एका वर्षाचे  ४६ हजार रुपये आणि   २० वर्षाचे एकूण  ९ लाख २० हजार रुपये. डी.पी. ३ नग,  प्रति नग ५ हजार रुपये असे एका वर्षाचे  १५ हजार रुपये  आणि २० वर्षाचे एकूण तीन लाख रुपये. व्यवसाय कर प्रति वर्ष २४ हजार रुपये असा एकूण २० वर्षाचे १७ लाख रुपये  कराची आकारणी केली आहे.

विनायक येसेकरलोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : महावितरण कंपनीने ग्रामपंचायतीच्या पथदिव्याचे कनेक्शन कापल्याची चर्चा व त्यावरून उठलेले वादंग तसेच शासन व  प्रशासनाने जाहीर केलेल्या भूमिका यासंबंधीच्या वृत्ताची शाई ताजी असतानाच भद्रावती तालुक्यातील भामडेळी ग्रामपंचायतीने महावितरण कंपनीवर १७  लाख रुपयांची कर आकारणी केल्याचे वृत्त समोर आले आहे. येत्या १५ दिवसात ग्रा.पं. कार्यालयात कर जमा करण्याची सूचना देण्यात आली आहे. भामडेळी ग्रा.पं. च्या  ८ ऑगस्ट २०२१ च्या मासिक सभेत या कर आकारणीचा ठराव सर्वसंमतीने पारित केला.या ठरावाच्या सत्यप्रत यासह १७ लाख रुपयांची कर वसुली करीत असल्याबाबतचे निवेदन अलीकडेच २८ ऑगस्ट रोजी  येथील वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता संतोष लोहे यांना देण्यात आले आहे.यावेळी भामडेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच शामल नन्नावरे, ॲड. अमोल जीवतोडे व भद्रावती तालुका  ग्रामसंवाद सरपंच संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. ग्रामपंचायत भामडेळीच्या सरपंच सुषमा जीवतोडे यांच्या अध्यक्षतेखाली ८ ऑगस्ट २०२१ रोजी पार पडलेल्या  मासिक सभेत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या इलेक्ट्रीक पोल व डीपी इत्यादीवर  गेल्या २० वर्षांपासूनचा कर आकारणे या विषयान्वये ठराव क्रमांक ६ / १ सर्वसंमतीने पारित करण्यात आला. या ठरावाचे सूचक उपसरपंच शामल नन्नावरे तर अनुमोदक ग्रा.पं. सदस्य विजय भोपरे आहेत. 

परवानगी न घेताच उभे केले वीज खांबया ठरावात असे नमूद करण्यात आले की मौजा भामडेळी येथे २० वर्षांपासून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने गावामध्ये, गावठाण हद्दीत व शेतजमिनीमध्ये विनापरवाना व कोणताही मोबदला न देता ईलेक्ट्रीक पोल व डी.पी. उभ्या केल्या आहे. त्यासाठी कंपनीने गावठाण व शेतजमिनीमधील जागेचा वापर केला आहे. यासाठी ग्रा.पं.कडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. परवानगी घेतली असल्यास ग्रा.पं.ला संबंधित कागदपत्रे विनाविलंब सादर करावी. आपल्या गावात महावितरण कंपनी व्यवसाय करून नफा मिळवित आहे. म्हणून ग्रा.पं.ने महावितरण कंपनीच्या इलेक्ट्रीक पोल व डी.पी.वर कायदेशीर मार्गाने कर आकारणी करावी. २० वर्षांपासून आजपर्यंतची कायदेशीर मार्गाने करवसुली करण्यात यावी, असे या ठरावात नमूद आहे.

असे आकारले करमहाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १२४ व कर व फी नियम ६६ भाग ब  अन्वये महावितरण कंपनीवर पुढीलप्रमाणे  कर आकारणी करण्यात आली. इलेक्ट्रीक पोल ४६ नग,  प्रती नग एक हजार रुपये असे एका वर्षाचे  ४६ हजार रुपये आणि   २० वर्षाचे एकूण  ९ लाख २० हजार रुपये. डी.पी. ३ नग,  प्रति नग ५ हजार रुपये असे एका वर्षाचे  १५ हजार रुपये  आणि २० वर्षाचे एकूण तीन लाख रुपये. व्यवसाय कर प्रति वर्ष २४ हजार रुपये असा एकूण २० वर्षाचे १७ लाख रुपये  कराची आकारणी केली आहे.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणTaxकर