शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

तळोधी(बा) येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा

By admin | Updated: September 20, 2015 01:29 IST

शालेय शिक्षण व क्रीडा संचालनालय आणि चंद्रपूर जिल्हा क्रीडा विभाग यांच्या विद्यमाने घेण्यात येणाऱ्या सत्र २०१५-१६ मधील शालेय पावसाळी क्रीडा स्पर्र्धा ...

तळोधी(बा) : शालेय शिक्षण व क्रीडा संचालनालय आणि चंद्रपूर जिल्हा क्रीडा विभाग यांच्या विद्यमाने घेण्यात येणाऱ्या सत्र २०१५-१६ मधील शालेय पावसाळी क्रीडा स्पर्र्धा नुकत्याच तळोधी(बा) येथील लोकविद्यालयाच्या मैदानावर पार पडल्या. सदर क्रीडा स्पर्धांमध्ये तालुक्यातील १४, १७ व १९ वर्षीय मुला-मुलींच्या संघानी खोखो, व्हॉलीबॉल व कबड्डी या खेळात उत्स्फुर्तपणे मोठ्या संख्येनी सहभाग नोंदविला होता. सदर पावसाळी क्रीडा स्पर्धामध्ये व्हॉलीबॉल या खेळ प्रकारात १४ वर्षीय (मुले) वयोगटातून सरस्वती विद्यालय कोजबी हा संघ विजयी तर टिष्ट्वंकल इंग्लिश स्कूल नागभीड उपविजयी, १७ वर्षीय वयोगट (मुले) यामध्ये सरस्वती विद्यालय कोजबी विजयी तर म.फुले विद्यालय तळोधी(बा) उपविजयी आणि १९ वर्षीय (मुलाचा) गटात म.फुले विद्यालय तळोधी(बा) चा संघ विजयी ठरला.कबड्डी या खेळ प्रकारात १४ वर्षीय (मुले) यामध्ये लोक विद्यालय सावरगाव विजयी तर अरुण झाडे विद्यालय नांदेड उपविजयी, मुलींच्या स्पर्धेत सावित्रीबाई फुुले विद्यालय गिरगाव विजयी तर महात्मा फुले विद्यालय तळोधी उपविजयी, १७ वर्षीय वयोगटात मुलांमध्ये समाजसेवा विद्यालय वाढोणा विजयी तर सरस्वती विद्यालय कोजबी उपविजयी, मुलींमध्ये महात्मा फुले विद्यालय तळोधी विजयी तर समाजसेवा विद्यालय वाढोणा उपविजयी, १९ वर्षीय वयोगटात मुलांमुलीमध्ये महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय तळोधी विजयी तर यादवराव पोशट्टीवार कनिष्ठ महाविद्यालय तळोधी उपविजयी ठरली आहे. (वार्ताहर)