शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

तळोधी पोलीस ठाणे न्याय हक्काचे रक्षण करणारे ठरावे

By admin | Updated: January 26, 2016 00:38 IST

पोलीस स्टेशन म्हणजे लोकांच्या न्याय हक्काच मंदिर असते. पोलीस स्टेशन मधून सर्व सामान्य माणसाला न्याय मिळण्याची अपेक्षा असते.

सुधीर मुनगंटीवार : नवनिर्मित पोलीस ठाण्याचे उद्घाटनचंद्रपूर : पोलीस स्टेशन म्हणजे लोकांच्या न्याय हक्काच मंदिर असते. पोलीस स्टेशन मधून सर्व सामान्य माणसाला न्याय मिळण्याची अपेक्षा असते. तळोधी पोलीस स्टेशन या परिसरातील लोकांच्या न्याय हक्काचे रक्षण करणारे ठरावे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. तळोधी (बा.) येथील नवनिर्मित पोलीस ठाण्याच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला खा. अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, आ. कीर्तिकुमार भांगडिया, विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, माजी आमदार अतुल देशकर, सभापती देवराव भोंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिह राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू व ठाणेदार विवेक सोनवणे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तळोधी पोलीस स्टेशन व्हावे ही या परिसरातील नागरिकांची बऱ्याच दिवसांची मागणी होती. त्यानुसार शासनाने २०१४ मध्ये या पोलीस स्टेशनला मान्यता दिली. या पोलीस स्टेशन अंतर्गत ४२ गावांचा समावेश आहे. पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीसाठी चारगाव मेंढा वलनी या ठिकाणी पाच एकर जागाही मंजूर करण्यात आली आहे. इमारत बांधण्यासाठी लवकर निधी देण्यात येईल, असे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. बल्लारपूर, पडोली व तळोधी येथील पोलीस स्टेशन इमारत आधुनिक व सुसज्ज व्हावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. आमदार कीर्तिकुमार भांगडीया, विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम व जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनीची यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन बबन बुरनुले यांनी तर आभार अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिह राजपूत यांनी मानले. कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)विकास प्रक्रिया लोकचळवळ व्हावीतळोधी बाळापूर या गावातील सिमेंट रस्ते बांधकासाठी २५-१५ या अंतर्गत येत्या अर्थसंकल्पात २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व मामा तलावाचे नूतनीकरण, दुरुस्ती व शेती सिंचनासाठी वापर हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. विकास हा केवळ शासनाचा कार्यक्रम न राहता तो लोकचळवळ व्हावी. लॉजिस्टिक हब, वैद्यकीय महाविद्यालय, सैनिकी शाळा, विजेच्या दरात कपात व मेक इन चंद्रपूर या सारख्या विकासाच्या योजनांमुळे विदर्भ विकासाला गती प्राप्त झाली आहे, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.