शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी व मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचा आजपासून बेमुदत संप

By admin | Updated: April 26, 2016 00:35 IST

महाराष्ट्र राज्य तलाठी संघ व मंडळ अधिकारी समन्वय महासंघाने प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात २६ एप्रिलपासून राज्यव्यापी बेमुदत संपाची घोषणा केली आहे.

दाखल्यांसाठी होणार धावपळ : प्रशासकीय कामे होणार प्रभावितचंद्रपूर : महाराष्ट्र राज्य तलाठी संघ व मंडळ अधिकारी समन्वय महासंघाने प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात २६ एप्रिलपासून राज्यव्यापी बेमुदत संपाची घोषणा केली आहे. या आंदोलनामुळे प्रशासकीय कामकाज खोळंबण्याची शक्यता आहे.या संपात चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा पटवारी संघ तथा मंडळ अधिकारी संघटना सहभागी होणार असल्याची माहिती विदर्भ पटवारी संघाचे अध्यक्ष अरुण झाडे आणि मंडळ अधिकारी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप जुमडे यांनी दिली आहे.तलाठी साजांची पुनर्रचना करणे, मंडळ अधिकारी कार्यालयाचे भाडे देणे, सातबारा व संगणकीकरण व ई-फेरफार मधील अडचणी दूर करणे, अवैध गौण खनिज कामातून तलाठी यांना वगळणे, महसूल खात्यात पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पद्धतीचा अवलंब करणे, तलाठी व मंडळ अधिकारी यांना पायाभूत प्रशिक्षण देणे, सरळ सेवेची २५ टक्के पदे खात्याअंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवणे, जिल्हास्तरावरील मागण्यांचा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जलदगतीने निपटारा होणे आदी मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यासंदर्भात ४ एप्रिल रोजी नोटीस दिली होती. मात्र याची दखल घेण्यात न आल्याने २६ एप्रिलपासून राज्यव्यापी बेमुदत संप करण्यात येत आहे. या आंदोलनात राज्यातील पटवारी व मंडळ अधिकारी सहभागी होणार आहेत. मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व पालकमंत्री, विरोधी पक्षनेता, आमदार, विभागीय आयुक्त, जमाबंदी आयुक्त तथा जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वीच निवेदन देण्यात आलेले आहे, असेही प्रसिद्धीपत्रकातून म्हटले आहे. त्यामुळेच या संपात जिल्ह्यातील पटवारी व मंडळ अधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुवल, विदर्भ पटवारी संघटनेचे अध्यक्ष महादेव राजुरकर, विदर्भ मंडळ अधिकारी संघटनेचे अध्यक्ष अशोक भोसले, गवस यांच्यासह संजय अनव्हाने, शे. बा. चव्हाण, डी.एम. पाटील, अशोक कोकाटे यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)