शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खोटी कागदपत्रे सादर करून नोकरी बळकावली

By admin | Updated: August 22, 2016 01:50 IST

खोटे कागदपत्र सादर करून अंगणवाडी सेविकेचे पद बळकावल्याचा आरोप आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे.

नागभीड सीडीपीओ कार्यालयातील प्रकार : गावकऱ्यांचा पत्रकार परिषदेत आरोपनागभीड : खोटे कागदपत्र सादर करून अंगणवाडी सेविकेचे पद बळकावल्याचा आरोप आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे. या प्रकरणाची नव्याने चौकशी करावी व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मांगलीच्या नागरिकांनी केली आहे.अंगणवाडी सेविका म्हणून रूजू झालेल्या विना प्रशांत पालपणकर यांनी त्यांच्या लग्नाची तारीख १ मे २०१५ अशी दर्शविली असली आणि हे लग्न साकोलीच्या नवदुर्गा उत्सव मंडळात झाले असल्याचे प्रमाणपत्र सादर केले असले तरी या लग्नाची नोंद मंडळाच्या रेकार्डवर नाही. हे लग्नच खोटे असून केवळ नोकरीच्या निमित्ताने जुळवून आणण्यात आले आहे, असा आरोप गावकऱ्यांनी यावेळी केला.अंगणवाडी सेविकेची पदभरती ५ मे २०१६ रोजी असताना पालपणकर यांनी ४ जानेवारी २०१६ रोजी रहिवासी प्रमाणपत्राकरिता मांगली ग्रामपंचायतकडे अर्ज केला. त्यावेळी मांगली येथे कार्यरत ग्रामसेवक प्रभारी होते. त्यांना मांगलीची कोणतीही माहिती नव्हती. मात्र अर्ज केला तेव्हा १४ जानेवारी २०१६ च्या आधार कार्डची झेराक्स पुरावा म्हणून देण्यात आला. त्याचा अर्थ पालपणकर यांनी ग्रामसेवकाची दिशाभूल केली आहे. लग्नाची खोटी नोंद दर्शवून शासनाची फसवणूक केली आहे, असाही आरोप गावकऱ्यांनी केला आहे.विना प्रशांत पालपणकर यांच्या निवडीवर व अर्जावर गावकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाने तर एकदा त्यांना अपात्रसुद्धा म्हटले आहे. नंतर गावकऱ्यांनी घेतलेल्या आक्षेपानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यात आली.मूल येथील गटविकास अधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी केली. पण पुरी यांनी ढळढळीत पुराव्यांकडे डोळेझाक करून पालपणकर यांच्या निवडीस मान्यता दिल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. पालपणकर यांनी सादर केलेले मांगली येथील रहिवासी प्रमाणपत्र खोट्या स्वाक्षऱ्या करून प्राप्त केले असून सरपंच व सचिवांनी याबाबत लेखी स्वरूपात खुलासाही केला आहे.असे असूनही चौकशी अधिकारी एस.जी. पुरी यांनी कोणती चौकशी केली, असा गावकऱ्यांचा सवाल आहे. या पत्रकार परिषदेला संजय माकोडे, पुरुषोत्तम मंगर, धर्मदास देशमुख, रवी देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)