शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर उभ्या वाहनांवर तात्काळ कारवाई करा!

By admin | Updated: April 13, 2017 00:44 IST

उपरवाही येथील अंबुजा सिमेंट उद्योगासमोर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे दैनंदिन वाहतुकीस बाधा निर्माण होत आहे.

हंसराज अहीर यांचे निर्देश : अंबुजा सिमेंट उद्योगासमोरील परिसराची पाहणीचंद्रपूर : उपरवाही येथील अंबुजा सिमेंट उद्योगासमोर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे दैनंदिन वाहतुकीस बाधा निर्माण होत आहे. येथे घडत असलेल्या अपघातामध्ये आजपर्यंत अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. वारंवार ताकीद देवूनही पोलिसांनी तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली नाही. याची तत्काळ दखल घेऊन पोलीस व आरटीने रस्त्यावर उभ्या वाहनांवर कारवाई करावी, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले आहे.ना. अहीर यांनी अंबुजा सिमेंट उद्योगासमोरील परिसराची पाहणी करून वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या दोषी वाहनांवर व संबंधित वाहन चालकावर परवाना रद्द करण्याची कारवाई करावी, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. या उद्योगासमोरील उभ्या वाहनांवर कारवाई करण्याच्या सातत्याने सुचना देवूनही व याबाबत स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय तसेच नागरिकांकडून उद्योगासमोरील वाहने हटविण्यासंदर्भात अनेकदा निवेदने व तक्रारी दिल्यानंतरही पोलिसांनी या गंभीर प्रश्नाकडे डोळेझाक केली. नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांना अभय देण्याचा प्रयत्न चालविल्याने अनेक लोकांना नाहक प्राण गमवावे लागले आहे. याची दखल घेवून आता अशा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दोषारोप ठेवून त्यांच्यावरही अनुशासनात्मक कारवाई पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी, असे निर्देश ना. हंसराज अहीर यांनी पोलीस व आरटीओच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)