शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

‘ त्या’ कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:41 IST

शंकरपूर : चिमूर तालूक्यातील प्राथमिक आरोग्य केन्द्रातील कंत्राटी कर्मचारी हे आपल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आदेश पाळत नसून उलट अरेरावीची ...

शंकरपूर

:

चिमूर तालूक्यातील प्राथमिक आरोग्य केन्द्रातील कंत्राटी कर्मचारी हे आपल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आदेश पाळत नसून उलट अरेरावीची भाषा वापरतात. भिसी आरोग्य केन्द्रातसुध्दा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी असभ्य वर्तणूक केली. अशी अरेरावी करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी चिमूर तालूक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच सर्व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.

भिसी येथील प्राथमिक आरोग्य केन्द्रात कंत्राटी तत्वावर कार्यरत परिचारिका बर्वे तथा भटेले यांनी येथील वैद्यकीय अधीकारी प्रियंका कष्टी तसेच डॉ. श्रीकांत काळे यांच्यावर आपल्याला मारहाण करुन शिवीगाळ केल्याचा आरोप केला. तसेच स्वत:च्या अंगावर स्पिरीट ओतून आत्महत्येची धमकी दिली होती. याबाबत दोघांनीही पोलिसात तक्रार केली. दोन्ही तक्रारींची दखल घेत भिसी पोलिसांनी अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली.

आम्ही सर्व वैद्यकीय अधीकारी अशाच प्रकारचा मानसिक त्रास सहन करीत आहोत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना काम सांगितल्यास त्या उलट आम्हालाच दमदाटी करतात व संघटनेची धमकी देतात, अशा अरेरावी करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी डॉ. राजेश कोवाके, डॉ. सुजाता शंभरकर, डॉ. मीनल पेटकर, डॉ. रितेश उमरे व चिमुर तालूक्यातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे.