शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

वाहन परवाना शिबिर घ्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:21 IST

अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त चंद्रपूर : स्थानिक गांधी चौक ते जटपुरा गेटपर्यंत नव्याने रस्ता तयार केला जात आहे. मात्र ...

अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त

चंद्रपूर : स्थानिक गांधी चौक ते जटपुरा गेटपर्यंत नव्याने रस्ता तयार केला जात आहे. मात्र यातही व्यावसायिक अतिक्रमण करीत आहेत. त्यामुळे नागरिकांना नाहक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महानगर पालिकेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

बसस्थानकांवर सोयी उपलब्ध कराव्यात

चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक बसस्थानकांवर सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. कोरपना, गडचांदूर, कोरपना, सावली या तालुका मुख्यालयामध्ये तर, बसस्थानकसुद्धा नाही. त्यामुळे येथे सोयीसुविधायुक्त बसस्थानक निर्माण करावे, अशी मागणी होत आहे. अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी, बसण्यासाठी जागा, शौचालय नाही.

डासांचा प्रादुर्भाव वाढला

वरोरा: शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बहुतांश वॉर्डामध्ये कचराकुंड्याच नसल्याने दिवसेंदिवस डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे.याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे.

वाहनतळाअभावी वाहनधारक त्रस्त

चंद्रपूर : शहरातील बहुतांश इमारतीमध्ये वाहनतळाची जागा नसल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. महानगरपालिकेच्या प्रशासनाने याकडे लक्ष देऊन वाहनतळाची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, गोलबाजार, आझाद बाग परिसरात तर वाहने रस्त्यावर ठेवली जात आहे.

नाल्यांचा उपसा करावा

चंद्रपूर : शहरातील बालाजी वार्ड, समाधीवार्ड तसेच काही वार्डतील नाल्या तुंबल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नाल्यांमध्ये घाण साचून असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला. मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांना तातडीने या वॉर्डात पाठविण्याची मागणी नागरिकांनी केली.

अतिक्रमण हटाव मोहीम थंडावली

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील वर्षी मार्च महिन्यात लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे अतिकमण मोहीम थंडावली. परिणामी शहरातील विविध मार्गांवर दुकानदार व काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे ते हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.

रस्त्यांची दुरुस्ती करावी

ब्रह्मपुरी : येथील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहन चालविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याची दुरुस्तीकरण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मोबाइलधारक त्रस्त

चंद्रपूर: मोबाइलचा वापर सर्वत्र वाढला आहे. पण काही कंपन्यांकडून अनावश्यक सेवांचा भडीमार ग्राहकांवर केला जात आहे. यामुळे मोबाइलधारक त्रस्त झाले आहेत. याची तक्रार संबंधित ग्राहक तक्रार केंद्राकडे करतात; पण त्याचा निपटारा होत नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.