शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
2
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
3
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
4
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
5
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
6
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
7
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
8
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
11
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
12
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
13
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
14
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
16
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
17
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
18
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
19
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
20
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा

भंडाऱ्याच्या ‘त्या’ आमदारावर कारवाई करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2016 00:46 IST

भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे आयोजित तिरंगा रॅलीप्रसंगी भंडाराच्या आमदाराने दारुच्या नशेत असलेल्या वाहन ...

निलंबनाची मागणी : पोलीस बाईजचे निवेदनचंद्रपूर : भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे आयोजित तिरंगा रॅलीप्रसंगी भंडाराच्या आमदाराने दारुच्या नशेत असलेल्या वाहन चालकावर कारवाई करणाऱ्या तुमसर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या गालावर थापड मारण्याची लांछनास्पद कृती केली. त्या आमदारावर कारवाई करुन निलंबित करण्याची मागणी पोलीस बाईज असोसिएशनने निवेदनाद्वारे केली आहे.भंडारा जिल्ह्यातील तुमसर पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या हुतात्मा स्मारकाजवळ मंच उभारुन तिरंगा रॅली व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भंडारा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार रामचंद्र अवसरे यांना आमंत्रित करण्यात आलेले होते. आमदाराचे भाषण सुरु असताना आमदारांचा वाहनचालक दारुच्या नशेत भाषणाचे चित्रिकरण करीत होता. चित्रिकरण करताना तो वारंवार रस्त्यावर येत होता. त्यामुळे कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई राजू साठवणे यांनी त्यास रस्त्याच्या कडेला उभे राहून चित्रिकरण करण्याबाबत समजावून सांगितले. परंतु त्याने आमदाराचा वाहनचालक असल्याचा आव आणून पोलीस शिपायाशी उद्धट बोलून चित्रिकरण सुरु ठेवले. भाषणाचा कार्यक्रम संपल्यानंतर आमदार आपल्या वाहनाजवळ गेले असता त्यांना वाहन चालकास पोलीस ठाण्यात नेल्याचे समजले. त्यामुळे रागाने त्यांनी पोलीस शिपाई राजू साठवणे यांच्या गालावर थापड मारली. या घटनेमुळे पोलिसांचे मनोधैर्य खचणे स्वाभाविक आहे. अशा घटनांवर भविष्यात अंकुश लागावा, याकरिता संबंधित आमदारावर कारवाई करून त्यास निलंबित करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन पोलीस बॉईज असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांशी आशुतोष सलील यांना सादर केले. (प्रतिनिधी)