शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

गुंडांवर कारवाई करु-अहीर

By admin | Updated: July 13, 2015 01:05 IST

राजुरा येथील भारतीय जनता पक्षाचे राजुरा शहर अध्यक्ष तथा पत्रकार बादल बेले यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला.

पत्रकारांनी दिले निवेदन : पाच तालुक्यातील पत्रकारांचा पुढाकारराजुरा : राजुरा येथील भारतीय जनता पक्षाचे राजुरा शहर अध्यक्ष तथा पत्रकार बादल बेले यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. या घटनेनंतर रविवारी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी बादल बेले यांच्या घरी जाऊन विचारपूस केली. यानंतर शासकीय विश्रामगृहामध्ये एक तास राजुरा येथील पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. जीवघेणा हल्ला करणाऱ्या आणि राजुरा शहरात गुंडागर्दी करणाऱ्यांची गय करू नका, कायदा व सुव्यवस्था योग्य रितीने पाळा अन्यथा पोलिसांनासुद्धा कारवाईला पुढे जावे लागेल, अशी ताकीद ना. हंसराज अहीर यांनी दिली.राजुरा येथील विश्रामगृहात राजुरा, बल्लारपूर, कोरपना, जिवती, गोंडपिपरी तालुक्यातील पत्रकार यावेळी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत ना. हंसराज अहीर, आ. अ‍ॅड. संजय धोटे यांना पत्रकारांनी निवेदन दिले. बादल बेले, प्रकाश खडसे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आणि पोलिसांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली. यासोबत पत्रकार हक्क कायदा व संरक्षणबाबत कायदा बनविण्याची मागणी केली. यावेळी पत्रकार राघवेंद्रराव देशकर, आनंद भेंडे, प्रा. बी.यू. बोर्डेवार, महीयर गुंडेविया, अनिलबाळ सराफ, एम.के. शेलोटे, चरणदास नगराळे, प्रा. राजेंद्र मोरे यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)